लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रशियातील सरकारी विद्यापीठांनी वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांना जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी पूर्ण व अर्ध शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. जागतिक स्तरावरील पायाभूत व संशोधन उच्च दर्जाच्या सुविधा व उच्चविभूषित प्रोफेसर्स या विद्यापीठांमध्ये असल्याने विद्यार्थ्यांना तिथे चांगल्या संधी येथे मिळतात, असे रशियातील सरकारी विद्यापीठांचे म्हणणे आहे. त्यात आयएम सेचेनॉव्ह मॉस्को मेडिकल युनिव्हर्सिटी, टॅमबॉव्ह स्टेट विद्यापीठ, पायटीगॉर्स्क वोल्गोग्रॅड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, अॅस्ट्राखान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, साराटोव्ह स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आणि अन्य विद्यापीठांचा समावेश आहे. कॉन्सुलेट जनरल आॅफ रशियन फेडरेशनने एड्युरशियाला भारतात रशियन सरकार व सरकारी विद्यापीठांमधील प्रवेशासाठी अधिकृत प्रवेश विभाग म्हणून नियुक्त केले आहे. एड्युरशिया ही संस्था रशियन सरकारच्या विद्यापीठांसाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विभाग म्हणून काम पाहते.रशियामधील विद्यापीठांमध्ये कोणतीही पॅकेज पद्धत नसून, विद्यार्थ्यांनी आपले शुल्क भरू नये. काही एजंट रशियन विद्यापीठांच्या वतीने चुकीच्या पद्धतीने पैसे गोळा करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती आणि प्रवेशांविषयीच्या अधिक माहितीसाठी ंस्रस्र’८@ी४ि१४२२्रं.्रल्ल (अॅप्लायअॅटएज्युरशियाडॉनइन) वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रशियात वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा
By admin | Published: July 01, 2017 2:39 AM