शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

निनावी पत्रामुळे मृत्यूचे गूढ उकलले

By admin | Published: December 17, 2015 1:50 AM

तालुक्यातील कळवंडे गावी जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एका तरुणाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी बैठक घेऊन त्याच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार पार पडले, परंतु एका अज्ञात

चिपळूण : तालुक्यातील कळवंडे गावी जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एका तरुणाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी बैठक घेऊन त्याच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार पार पडले, परंतु एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना पाठविलेल्या पत्रामुळे या खुनाला वाचा फुटली आणि यातील सातही आरोपी गजाआड झाले.सुनील (३०) व मिलिंद बाळाराम जावळे या दोन भावांसह संदेश विष्णू शिगवण, प्रकाश तुकाराम शिगवण, गंगाराम सीताराम नाचरे, विजय पांडुरंग नाचरे, मंगेश तुकाराम नाचरे, विशाल उर्फ नानू विठ्ठल कदम हे २८ नोव्हेंबरला कळवंडे जंगलात शिकारीला गेले होते. शिकार करण्यासाठी झाडलेली बंदुकीची गोळी सुनील जावळेला लागली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह कामथे जावळेवाडी येथे आणून वाड्यात ठेवण्यात आला. सुनीलच्या पत्नीलादेखील मृतदेह दाखविण्यात आला नाही. लगेच वाडीत बैठक घेऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला व २९ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता सुनीलवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदूक लपविली, तसेच रक्ताने माखलेल्या कपड्यांसह सर्वच पुरावे नष्ट करण्यात आले.पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांना ३ डिसेंबर रोजी कामथे गावातून एक निनावी पत्र आले. त्यात हा सर्व तपशील नमूद करण्यात आला होता. त्या पत्राशिवाय कोणताही पुरावा हाती नव्हता. शिवाय ग्रामस्थ खरी माहिती देणे शक्य नव्हते. सहायक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अतिशय गुप्त रीतीने याचा तपास केला आणि सोमवारी रात्री सर्व सातही आरोपींना ताब्यात घेतले. मंगळवारी दिवसभर या आरोपींची चौकशी सुरू होती. या सात जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच भारतीय हत्यार कायदा लागू करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)