शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

आणखी २०० रस्त्यांची चौकशी

By admin | Published: April 27, 2016 6:19 AM

दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील चौकशी पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहे़

मुंबई : रस्त्यांच्या चौकशीत सरासरी ५३ टक्के कामांमध्ये अनियमितता आढळून आल्यानंतर, दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील चौकशी पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहे़ यामध्ये दोनशे रस्त्यांची पाहणी करून कामाचा दर्जा तपासण्यात येणार आहे़ त्यामुळे या घोटाळ्यातून आणखी काही मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे़खड्डेमुक्त मुंबईसाठी अतिरिक्त आयुक्त एस़व्ही़आऱ श्रीनिवास यांनी साडेसात हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांचा मास्टर प्लॅन तयार केला होता़ मात्र, या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे आढळून आल्यानंतर, आयुक्त अजय मेहता यांनी हा मास्टर प्लॅन गेल्या वर्षी रद्द केला़ आॅक्टोबर २०१५ मध्ये महापौर स्नेहल आंबेकर यांच्या मागणीनुसार चौकशी समिती स्थापन करण्यात आली़ या समितीने ११५ पानांच्या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या़ ठेकेदारांचे हित जपण्यासाठी निविदेतील निकषांमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी ठेवण्यात आल्याकडे समितीने लक्ष वेधले़ त्याचबरोबर, ठेकेदार, अधिकारी व थर्ड पार्टी आॅडिटरवर कारवाईची शिफारस करीत तशी प्रक्रियाही सुरू करण्यात आली़ याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत चौकशीचा दुसरा टप्पा पुढच्या आठवड्यात सुरू करण्याचा निर्णय झाला़ (प्रतिनिधी)>पहिल्या टप्प्यातील चौकशीतून कारवाईके़ आऱ कन्स्ट्रक्शन, महावीर इन्फ्रा, आरपीएस, आऱ के़ मदानी, जे़ कुमार, रेलकॉन हे ठेकेदार आणि थर्ड पार्टी आॅडिटर एसजीएस आणि आयआरएस या कंपनीला काळ्या यादीत टाकणे, नोंदणी रद्द करणे व त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे़ रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यात रस्ते व दक्षता खात्यातील अधिकारी अपयशी ठरले आहेत़ या घोटाळ्यात दुय्यम अभियंता, सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपप्रमुख अभियंता, प्रमुख अभियंता असे मोठ्या प्रमाणात अधिकारी गुंतले आहेत़ सर्वप्रथम रस्ते विभागाचे तत्कालीन प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्यातील अधिकारी उदय मुरुडकर यांना निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे़ मात्र, मुरुडकर यांना नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे़ >विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोलच्या घोटाळ्यात सत्ताधारी शिवसेनेचाही हात असण्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे़ या प्रकरणात स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांचीही चौकशी करण्याची मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी आज केली़ रस्त्यांच्या या प्रस्तावांना विरोध केल्यानंतरही सत्ताधाऱ्यांनी हे प्रस्ताव मंजूर केले़ च्त्यामुळे या घोटाळ्यासाठी ते जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला़, तर या घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखाकडे सोपविण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली आहे़ अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांचीही या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी केली आहे़>चौकशीच्या दुसऱ्या टप्प्यात काय?च्या घोटाळ्यामध्ये ठेकेदारांपासून, अधिकारी व थर्ड पार्टी आॅडिटरही गुंतले असल्याचे पहिल्या टप्प्यातील चौकशीत उजेडात आले़ रस्ते व दक्षता विभागातील अनेक अधिकारी यात गुंतले असल्याने, त्यांची जबाबदारी आता निश्चित करण्यात येणार आहे़च्त्याचबरोबर, आणखी दोनशे रस्त्यांच्या कामांची छाननी होणार आहे़ त्यामुळे सुमारे तीन हजार कोटींच्या या घोटाळ्यातून आणखी काही धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे़ २०१३ ते २०१५ मध्ये दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यांची चौकशीही यात होणार आहे़