पुणे : पुणे जिल्ह्यात मे महिन्यात पाणी टंचाई वाढू लागली असून विविध तालुक्यांमधून २१टँकर्सची मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे.सध्या सुरू असलेल्या १७टँकर्सच्या संख्येत नजिकच्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांनी आज पत्रकारांना सांगितली.१७ टँकरच्या ५१ खेपा सध्या सुरू असून १२गावे,७४ वाड्यांमधील २३हजार८८३लोकसंख्येला या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.पुरंदर वगळता अन्यत्र शंभर टक्के खेपा सुरू आहेत. ७विहिरी आणि ३विंधन विहिरींचे खासगी मालकांकडून अधिग्रहण करून टंचाईग्रस्त नागरिकांसाठी त्या खुल्या करण्यात आल्या आहेत.भोरमध्ये पिकअप व्हॅनव्दारा एका गावाला पाणीपुरवठा केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.बारामती तालुक्यात सध्या ७टँकर सुरू असून आ णखी ५ टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे.जुन्नरमध्ये टँकर नव्हता, आता ४ टँकरची मागणी झाली आहे.मावळ व मुळशीतूनही प्रत्येकी एक तर वेल्हे तालुक्यात ३ टँकरची गरज आहे. इंदापूरमधून २ टँकरची मागणी झाली आहे, असे ते म्हणाले.खेड आणि आंबेगाव तालुक्यांमध्ये प्रत्येकी २टँकर सुरू असून आणखी एका टँकरची मागणी झाली आहे. हवेली तालुक्याने २टँकरची मागणी केली आहे. येथे पुर्वी २ टँकर होते. भोरमध्ये पुर्वीच ३ तर पुरंदरमध्ये २ टँकर सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यात आणखी २१ टँकरची मागणी
By admin | Published: May 07, 2014 8:35 PM