लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने आणखी ६० फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी गणेश उत्सव काळात कोकण मार्गावर १४२ फेऱ्या चालवण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यामुळे यंदा गणेश उत्सवात एकूण २०२ रेल्वेच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.पनवेल ते सावंतवाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी आणि मुंबई ते चिपळूण या मार्गावर नव्याने घोषित केलेल्या ६० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ०११८९-०११९० पनवेल-सावंतवाडी विशेष (८ फेऱ्या) ट्रेन १९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत दर शनिवारी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून, सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी दर शनिवारी सकाळी ८ वाजता सावंतवाडीहून सुटलेली ट्रेन पनवेलला संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे.०११९१-०११९२ पनवेल-सावंतवाडी विशेष (८ फेऱ्या) ट्रेन २० आॅगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान दर शनिवारी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून, सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी दर शनिवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सुटलेली ट्रेन पनवेलला संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. ०१०४३-०१०४ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी स्पेशल ट्रेन (८ फेऱ्या) १८ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान दर शुक्रवारी मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटणार असून, करमाळीला सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटलेली ट्रेन एलटीटीला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे.०१०४५-०१०४६ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी स्पेशल ट्रेन (६ फेऱ्या) २१ आॅगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान दर सोमवारी मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटणार असून, करमाळीला सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटलेली ट्रेन एलटीटीला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. ०११७९-०११८० मुंबई-चिपळूण स्पेशल ट्रेन (२२ फेऱ्या) २० आॅगस्ट ते १२ सप्टेंबरदरम्यान मंगळवार, गुरुवारी आणि रविवारी पहाटे ५ वाजता सुटणार असून, चिपळूणला सकाळी १० वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी मंगळवार, गुरुवार आणि रविवारी संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुटलेली ट्रेन मुंबईला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. याशिवाय पुणे- सावंतवाडीदरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.मुंबई सेंट्रल, वांद्रे येथून सुटणार प.रे.च्या ट्रेनमध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेनेदेखील गणेशोत्सवासाठी विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि वांद्रे टर्मिनस येथून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.ट्रेन क्रमांक ०९००१ मुंबई सेंट्रल-मंगलोर, ट्रेन क्रमांक ०९००९ वांद्रे टर्मिनस-करमाळी एक्स्प्रेस, ०९००७ मुंबई सेंट्रल-मडगाव या विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. अहमदाबाद ते करमाळी या मार्गावर १० विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गणपती विशेष एक्स्प्रेस-ट्रेनची बुकिंग १५ जुलैपासून सुरू होणार आहे.
कोकणासाठी आणखी ६० फेऱ्या
By admin | Published: July 14, 2017 5:19 AM