शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आणखी ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 5:52 AM

पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या राज्यातील ५० मंडळांतील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.

मुंबई : पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या राज्यातील ५० मंडळांतील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली. याआधी सरकारने ५ हजार गावांत दुष्काळ जाहीर केला असून १४ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.राज्यातील दुष्काळी भागांमध्ये राबविण्यात येणाºया उपाययोजनांचा आढावा गुरुवारी मंत्रालयात घेण्यात आला. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, पाणी टंचाई असलेल्या आणखी काही गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती. त्यामुळे ज्या मंडळामधील गावांमधील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे व कमी पर्जन्यमान आहे, अशा गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येत आहे.या गावांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळांतील शेतकºयांच्या कर्जाची पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.दुष्काळ जाहीर झालेली मंडळेधुळे जिल्हा : साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल, दुसाणे, साक्री, कासारे, दहीवेल मंडळांतील ११६ गावे.अहमदनगर जिल्हा : अकोले तालुक्यातील अकोले, वीरगाव, समशेरपूर, कोतुळ, ब्राह्मणवाडा येथील ११६ गावे.जळगाव जिल्हा : एरंडोल तालुक्यातील एरंडोल व रिंगणगावमधील ३६ गावे. तसेच धरणगाव तालुक्यातील धरणगाव, साळवा, पाळधी, पिंप्री, चांदसर येथील ५९ गावे.परभणी जिल्हा : गंगाखेड व जिंतूर तालुक्यातील गंगाखेड, सांगवील बामणी या महसूल मंडळांतील ८० गावे.जालना जिल्हा : मंठा तालुक्यातील मंठा व ढोकसाळ सर्कलमधील ५८ गावे.उस्मानाबाद जिल्हा : उमरगा तालुक्यातील उमरगा, मुरुम, नारंगवाडी, मुळज, दाळिंब या मंडळांतील ९६ गावे.सातारा जिल्हा : खटाव तालुक्यातील निमसोड, मायणी, पुसेगाव, बुध, खटाव, औंध, पुसळेवाडी, कातरखटाव या मंडळांमधील १११ गावे.बुलढाणा जिल्हा : बुलढाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, जळगाव जामोद या तालुक्यांतील बुलढाणा, देऊळघाट, पाडळी, रायपूर, धाड, चिखली, उनद्री, आमडापूर, हातणी, मेरा, महेकर, हिवराश्रम, देऊळगाव मही, जळगाव, जामोद या मंडळांतील २४६ गावे.असा मिळणार दिलासाकर्ज वसुलीला स्थगितीरोजगार हमी योजनेमध्ये१०० दिवसांऐवजी१५० दिवस मजुरीविद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफयापूर्वी घेतलेले परीक्षा शुल्क जानेवारी अखेपर्यंत परत करण्यास विद्यापीठांना सूचना

टॅग्स :droughtदुष्काळ