NCP Ajit Pawar ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाच्या महिनाभरानंतर मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले. मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली असताना आता आणखी एक नेता नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि नुकतीच ज्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली ते दत्तात्रय भरणे हे मनासारखं खातं न मिळाल्याने पक्षनेतृत्वावर नाराज असल्याचे समजते.
नवीन मंत्रिमंडळात दत्तात्रय भरणे यांच्यावर क्रीडा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या भरणे यांना आता चांगल्या खात्याची अपेक्षा होती. परंतु क्रीडामंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांनी अद्याप या खात्याचा कारभार स्वीकारलेला नाही. तसंच ते आपल्या कुटुंबासह परदेशात निघून गेल्याचे समजते. दत्तात्रय भरणे हे मंगळवारी भारतात परणार असल्याची माहिती आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे भरणे यांनी तीनही वेळा राज्याच्या राजकारणात मातब्बर नेते अशी ओळख असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आहे. त्यामुळे भरणे यांची नाराजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
राज्य मंत्रिमंडळात कोणावर कोणत्या खात्याची जबाबदारी?
चंद्रशेखर बावनकुळे : महसूल
राधाकृष्ण विखे – पाटील : जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत (दादा) पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य
गिरीश महाजन : जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.
गणेश नाईक : वने
गुलाबराव पाटील: पाणी पुरवठा व स्वच्छता.
दादाजी भुसे: शालेय शिक्षण.
संजय राठोड : मृद व जलसंधारण.
धनंजय मुंडे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.
मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता.
उदय सामंत : उद्योग, मराठी भाषा
जयकुमार रावल : पणन, राजशिष्टाचार.
पंकजा मुंडे : पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन.
अतुल सावे : इतर मागास, बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा
अशोक उईके : आदिवासी विकास.
शंभुराज देसाई : पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.
आशिष शेलार : माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य.
दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.
आदिती तटकरे : महिला व बालविकास.
शिवेंद्रसिंह भोसले : सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).
ॲड. माणिकराव कोकाटे : कृषी.
जयकुमार गोरे : ग्रामविकास व पंचायत राज.
नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन , विशेष सहाय्य.
संजय सावकारे : वस्त्रोद्योग.
संजय शिरसाट : सामाजिक न्याय.
प्रताप सरनाईक : परिवहन
भरत गोगावले : रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास.
मकरंद जाधव (पाटील) : मदत व पुनर्वसन.
नितेश राणे : मत्स्यव्यवसाय व बंदरे.
आकाश फुंडकर : कामगार.
बाबासाहेब पाटील : सहकार.
प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.
राज्यमंत्री
ॲड. आशिष जयस्वाल : वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार,
माधुरी मिसाळ : नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.
डॉ. पंकज भोयर : गृह ( ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म.
मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम).
इंद्रनील नाईक : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण.
योगेश कदम : गृह ( शहरी) महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन.