राष्ट्रवादीचा आणखी एक नेता जामिनावर बाहेर, 8 वर्षांपासून तुरुंगात होते माजी आमदार...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 01:06 PM2023-08-20T13:06:18+5:302023-08-20T13:35:40+5:30

सगळ्याचा विचार करून कोणत्या गटात जायचे ते ठरविणार आहे, बाहेर येताच बदललेल्या राजकारणाचे सुतोवाच

Another NCP leader out on bail, former MLA Ramesh kadam in thane jail for 8 years, mohol solapur politics anna bhau sathe mahamandal fraud case | राष्ट्रवादीचा आणखी एक नेता जामिनावर बाहेर, 8 वर्षांपासून तुरुंगात होते माजी आमदार...

राष्ट्रवादीचा आणखी एक नेता जामिनावर बाहेर, 8 वर्षांपासून तुरुंगात होते माजी आमदार...

googlenewsNext

अजित पवार भाजपासोबत सत्तेत गेल्यानंतर राष्ट्रवादीचे तुरुंगात असलेले नेते एकामागोमाग एक असे बाहेर येऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी दीड वर्ष ईडीच्या कारवाईत तुरुंगात असलेले माजी मंत्री, आमदार नवाब मलिक यांची वैद्यकीय जामिनावर सुटका झाली होती. आता अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कोट्यवधी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी आमदार रमेश कदम हे जामिनावर बाहेर आले आहेत.

राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना ठाणे मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सोडण्यात आले आहे. कारागृहाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. रमेश कदम राष्ट्रवादीचे माजी आमदार होते. 2014 त्यानंतर 2019 साली तुरुंगात असताना त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून सोलापूर मोहोळ या मतदार संघातून निवडणूक लढवली होती.

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कोट्यवधी घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. तब्बल 8 वर्षाच्या नंतर रमेश कदम हे ठाणे मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले आहेत. यासाठी मुंबई, ठाणे, सोलापूर अशा विविध ठिकाणावरून मातंग समाजाचे कार्यकर्ते जमले होते.

रमेश कदम यांचे ठाणे मध्यवर्ती कारागृह बाहेर मातंग समाजाकडून जंगी स्वागत करण्यात आले. रमेश कदम हे त्यांच्या बोरीवली मधील निवासस्थानी जाण्यास रवाना झाले आहेत. मोहोळ मधील राजकीय परिस्थिती, मतदारांचा कल, कार्यकर्त्यांची मते या सगळ्याचा विचार करून  कोणत्या गटात जायचे ते ठरविणार आहे, असे रमेश कदम म्हणाले.

पंधरा दिवसात मोहोळमध्ये येणार : रमेश कदम
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज स्वरूपात पैसे वाटले आहे. त्यामुळे त्याला करप्शन म्हणता येणार नाही. या प्रकरणात झालेल्या आरोपाची तपासणी करून न्यायालयाने आज जामीन मंजूर केले आहे. आठ वर्षाच्या कार्यकाळात मोहोळ मतदारसंघात अनेक बदल घडले आहेत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात मोहोळमध्ये जाऊन राजकीय परिस्थितीची माहिती घेऊन पुढील भूमिका ठरवणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार रमेश कदम यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर दिली.

Web Title: Another NCP leader out on bail, former MLA Ramesh kadam in thane jail for 8 years, mohol solapur politics anna bhau sathe mahamandal fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.