नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून मध्यान्ह भोजन योजनेतील गैरव्यवहारावर २५ आॅगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष यासंदर्भात सुनावणी झाली. यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केलीअसून प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी अॅड. प्रशांत ठाकरेयांची न्यायालय मित्र म्हणूननियुक्ती केली आहे. याप्रकरणातील प्रतिवादींमध्येशिक्षण अधिकाºयांसह इतरांचा समावेश आहे़
‘मध्यान्ह भोजन योजनेतील गैरव्यवहारावर उत्तर द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:37 AM