मुंबई - भीमा कोरेगाव प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी केली आहे. भीमा कोरेगावमध्ये जे घडलं ते मूळ प्रकरण अनेक प्रकारे रंगवून सांगितलं गेलं त्यामुळे परिस्थिती बिघडली. सोशल मीडियावरही चुकीची माहिती पसरवली गेली त्यामुळे दोषी कुठल्याही जाती, धर्माचे असोत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी केली.
भीमा कोरेगाव घटनेला संपूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे. भीमा-कोरेगाव दोन गट समोरासमोर येणार नाहीत याची पोलिसांनी काळजी घ्यायला हवी होती. भीमा कोरेगावच्या घटनेला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप सकल मराठी क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी यावेळी करण्यात आला. असा आरोप सकल मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला.
दलित समाजाच्या भावनांशी आम्ही समरस आहोत. पण हिंसाचाराचे समर्थन करत नाही असे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी सांगितले. मराठा समाजाने शांततेच्या माध्यमातून 58 मोर्चे काढले. मराठा विरुद्ध दलित वाद निर्माण करण्याच्या जो प्रयत्न सुरु आहे त्याचा आम्ही निषेध करतो असे सकल मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले.
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे -
- मूळ प्रकरण अनेक प्रकारे रंगवून सांगितलं त्यामुळे परिस्थिती बिघडली
- दोषी कुठल्याही जाती, धर्माचे असोत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे
- दलित समाजाच्या भावनांशी समरस आहोत
- भीमा कोरेगाव घटनेला पोलीस प्रशासन जबाबदार
- भीमा कोरेगाव प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी
महाराष्ट्र बंद अखेर मागे, काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत - प्रकाश आंबेडकर
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, भीमा कोरेगाव घटनेतील मुख्य सूत्रधार शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आहेत. जो न्याय याकूब मेमनला लावला तोच न्याय संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना लावा. तसेच, त्या दोघांना सरकारने अटक करावी, अशी मागणी केली. याचबरोबर काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.