नवी मुंबई : कृषीमालाच्या व्यापारासाठी दोन घटकांसाठी दोन वेगळया नियमावली करणे अयोग्य असुन सर्वांना सरसकट एकच नियम लागू करावे या मागणीसाठी राज्यातील ३०५ बाजारसमित्या ४ जुलैला बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई बाजारसमितीमध्ये माथाडी कामगार व व्यापाऱ्यांचा मेळावा आयोजित केला असुन या मेळाव्यात शासनाच्या धोरणातील त्रृटी निदर्शनास आणुन दिले जाणार आहे. शासनाने व्यापारी व कामगारांचे प्रश्न सोडविले नाही तर भविष्यात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवशी लाक्षणिक आंदोलन करत असल्याचे व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे यांनी सांगितले. बाजारसमितीमधील व्यापाऱ्यांना अनेक बंधने घालून मार्केटबाहेर व्यापार करणाऱ्यांना सर्व नियमातून सूट दिली जाणार आहे. शासनाच्या या दूहेरी भूमिकेचा निषेध करण्यासाठी या राज्यव्यापी बंदचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
थेट पणन विरोधात आज एपीएमसी बंद
By admin | Published: July 04, 2016 4:47 AM