शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नवीन मतदारांच्या जागृतीसाठी ‘अ‍ॅप’

By admin | Published: September 28, 2016 10:49 PM

सोशल मीडिया : ‘फेसबुक’च्या स्क्रीनवरही येणार संदेश

शोभना कांबळे -- रत्नागिरी --नव्या मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी आता राज्य निवडणूक आयोगाकडून मोबाईल अ‍ॅप तसेच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. यामुळे नव्या मतदारांमध्ये आपण मतदारयादीत नाव नोंदणी करणे गरजेचे असल्याची जाणीव निर्माण होण्यास मदत होणार आहे. अजूनही मतदारांना मतदानाचे महत्व कळत नसल्याने निवडणुकीच्या वेळी मतदानाची आकडेवारी म्हणावी तशी वाढलेली नाही. त्यामुळे योग्य उमेदवार निवडून येण्यात अडचण येत आहे. मतदानाची आकडेवारी वाढण्यात नव्या मतदारांची नोंद मतदार यादीत होणे गरजेचे आहे. मात्र, अजूनही त्यांच्यात याबाबत उदासीनता दिसून येते. त्यामुळे आता नव्या मतदारांना मतदानाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे लवकरच मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आकाशवाणीवरील मुलाखतीत ही माहिती दिली. या अ‍ॅपच्या माध्यमातून मतदाराचे नाव मतदार यादीत आहे का, असेल तर कुठल्या यादीत आदी माहिती मिळू शकणार आहे. त्यायोगे त्यात बदल करण्याची गरज असेल तर ती संबंधित तहसील कार्यालयात करता येऊ शकेल.तसेच फेसबुक, टिष्ट्वटर आदी सोशल मीडियाचा वापर नव्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी होणार आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या स्क्रीनवर ‘आपण मतदार यादीत नाव नोंदविले आहे का’ असा संदेश सुरूवातीलाच झळकणार आहे. त्यामुळे मतदाराला आपण नाव नोंदविणे गरजेचे आहे, याची जाणीव होईल. याचबरोबर महाविद्यालयीन स्तरावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यामधूनही जागृती करण्यात येणार आहे. मतदारसंख्या वाढणार?मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी करण्यात येत असलेल्या या प्रयत्नांमुळे येत्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या वाढेल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे. फेसबुक, टिष्ट्वटर आदी सोशल मीडियाचा वापर नव्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी होणार आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या स्क्रीनवरही आता मतदारांच्या जागृतीचे प्रयत्न होताना दिसत आहेत.