पुणे : श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ््यात सहभागी होणा-या लाखो वारक-यांना आवश्यक माहिती व मदत तात्काळ पुरविणे यासाठी स्वतंत्र ‘अॅप’ विकसित केले आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे , आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, प्रदीप मोरे यांनी हे अॅप विकसित केले आहे. या पालखी अॅपच्या माध्यमातून पालखी सोहळ््यामध्ये सहभागी होणा-या वारक-यांना पालखीचे प्रस्थान, विसावा व मुक्कामाचे ठिकाण, पालखी सोहळ््याचे प्रमुख व त्यांची माहिती, वैद्यकीय सेवा, टँकरची माहिती, गॅस सिलिंडर मिळण्याची व पुरवठा करणा-यांची माहिती, पालखी सोहळ््याच्या नियोजनामध्ये सहभागी झालेल्या अधिका-यांची माहिती, पोलिस प्रशासन व आपत्कालीन परस्थितीत पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशामन, आदी महत्वाची माहिती पुरविण्यात येणार असल्याचे राजेंद्र मुठे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे पालखी सोहळ्यासाठी ‘अॅप’
By admin | Published: June 28, 2016 1:34 AM