जमीर काझी,
मुंबई- समाजातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांच्या हातात हात घालून सहकार्य करणाऱ्या राज्यभरातील पोलीस मित्रांना आता एक नवे माध्यम मिळाले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्या नावाचे स्वतंत्र मोबाइल अॅप कार्यान्वित केले आहे. पोलिसांना सहकार्य करणाऱ्या नागरिकांना ‘पोलीसमित्र’ म्हणून संबोधले जाते. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ही महत्त्वपूर्ण संकल्पना राज्यभरात राबविली आहे. त्यासाठी पोलीसमित्र हे स्वतंत्र मोबाइल अॅप बनविण्यात आले आहे. महाराष्ट्र अॅपचे अॅडमिन पॅनल ६६६.स्रङ्म’्रूीे्र३१ं.ङ्म१ॅ इथे उपलब्ध आहे. त्याचा लॉग इन आयडी व पासवर्ड ंे्रिल्ल आहे. राज्यातील १० आयुक्तालये व ३५ अधीक्षक कार्यालयांतर्गत प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय नोंदणी व जबाबदारीचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी सर्व घटकप्रमुखांनी त्याबाबत अधिकाधिक माहिती प्रसारित करून नागरिकांना या योजनेत सहभागी करून घेण्याची सूचना महासंचालक दीक्षित यांनी केली आहे. पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे असल्याने त्यासाठी नागरिकांचे सहकार्य घेण्याची संकल्पना ‘पोलीसमित्र’ या योजनेत आहे. त्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांची सविस्तर माहिती, त्याचे शिक्षण, व्यवसाय आणि पोलिसांना सहकार्य करण्यामागील हेतू याबाबतचा तपशील घेतल्यानंतर त्यांना पोलीसमित्र बनविले जात आहे. त्यांची नोंदणी व त्यांच्या कामाचे नियंत्रण करण्याकरिता पोलीसमित्र महाराष्ट्र हे मोबाइल अॅप बनविले आहे. १५ जूनपासून ते सर्वांसाठी खुले केले आहे. त्यामध्ये आतापर्यत सुमारे ६३ हजार जणांची नोंदणी झाली आहे. मात्र गेल्या १५ दिवसांत आतापर्यंत केवळ २८४ पोलीस ठाण्यांनी या अॅपवर नोंदणी केली आहे. ६३ हजार नागरिकांची नोंदणीराज्य पोलीस दलात सध्या १० आयुक्तालये व ३५ अधीक्षक कार्यालये आहेत. या ठिकाणी एकूण १०७६ पोलीस ठाणी आहेत.आतापर्यंत६३ हजार नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. >अशी करा नोंदणीसंबंधित लिंकवर महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांनी लॉगइन करून पोलीस ठाणे नोंद करावयाचे आहे. तसेच पोलीस ठाण्याची आवश्यक ती सर्व माहिती भरून त्यासाठी युजर नेम व पासवर्ड तयार करावयाचा आहे. नमूद अॅडमिन पॅनलवर आपणाला हद्दीत नोंद झालेल्या पोलीसमित्रांची यादी व त्यांच्यासोबत संपर्क साधून त्यांची जबाबदारी निश्चित करता येईल. त्यासाठी सर्व पोलीस अधिकारी/ अंमलदार यांनी हे मोबाइल अॅप इन्स्टॉल करायचे आहे.
नागरिकांना आवाहनया संकल्पनेसाठी अधिकाधिक नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. नागरिकांचा सहभाग हाच त्यामागील उद्देश आहे. त्यामुळे राज्यातील सुरक्षितता अधिक भक्कम होईल.- प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक