मुंबई : महावितरणच्या विविध ग्राहक सुविधांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)च्या ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. राज्यभरातील सुमारे २३ लाख वीजग्राहकांनी मोबाइल अथवा ई-मेल आयडीची आतापर्यंत नोंदणी केली आहे.मोबाइल क्रमांक किंवा ई-मेलची नोंदणी करण्यासाठी पर्याय आहेत. यात १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा मोबाइल अॅपवर नोंदणीची सुविधा आहे. ई-मेल आयडीची नोंदणी केल्यास ग्राहकांसमोर ई-बिल व गो-ग्रीन असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. अधिक माहिती संकेतस्थळावर मिळेल. (प्रतिनिधी)
ग्राहकांना मो.नंबर ई-मेल नोंदणीचे आवाहन
By admin | Published: June 25, 2016 3:33 AM