- अरुण बारसकरसोलापूर : २० आॅक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या यंदाच्या हंगामासाठी राज्यातील १९५ कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गाळप परवाने मागितले आहेत. त्यात पुणे विभागातील सर्वाधिक ६४ कारखान्यांचा समावेश आहे. गतवर्षी १८७ साखर कारखान्यांनी गाळप परवाने घेतले होते.२०१७-१८च्या गाळप हंगामासाठी राज्यात उसाचे क्षेत्र ९ लाख २ हजार हेक्टर होते. यावर्षीच्या २०१८-१९ च्या हंगामासाठी राज्यात ११ लाख६२ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसआहे. अर्थात यंदा दोन लाख ६० हजार हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे.पुणे विभागातील पुणे, सोलापूर व सातारा या जिल्'ात सर्वाधिक ४ लाख १४ हजार २३३ हेक्टर ऊस असून, या विभागातील तब्बल ६४ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत, अशी अधिकृत माहिती मिळाली.थकलेली एफआरपीची रक्कम देणाºया साखर कारखान्यांनाच गाळप परवाना दिला जाईल. २० आॅक्टोबरपर्यंत शेतकºयांचे पैसे चुकते करण्याचे आदेश कारखान्यांना दिले आहेत. एफआरपीमधून कोणाचीही सुटका नाही.- सुभाष देशमुख, सहकार व पणनमंत्रीकारखान्यांची संख्याविभाग सहकारी खासगीअहमदनगर १६ १२अमरावती ०० ०२औरंगाबाद १३ ११कोल्हापूर २५ १२नागपूर ०० ०४नांदेड १६ २०पुणे ३० ३४एकूण १०० ९५
गाळपासाठी १९५ साखर कारखान्यांचे अर्ज; पुणे विभागातील ६४ कारखान्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 1:20 AM