मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मंगळवारपासून परीक्षा अर्ज भरता येणार आहे. ७ ते २0 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरता येईल.फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी, खासगी विद्यार्थी तसेच तुरळक विषय घेऊन आॅक्टोबर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज आॅनलाइन सादर करावे लागणार आहेत. www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हे अर्ज उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत नियमित शुल्कासह २0 जुलैपर्यंत आणि विलंब शुल्कासह २१ ते २८ जुलैपर्यंत अर्ज भरता येईल. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या याद्या १ आॅगस्टपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. फेब्रुवारी^-मार्च २0१५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती अर्ज भरताना महाविद्यालयांना आॅनलाइन घेता येणार आहे.
बारावी आॅक्टोबर परीक्षेचे अर्ज मंगळवारपासून
By admin | Published: July 06, 2015 3:34 AM