शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

रश्मी शुक्लांवरील कारवाई मागे घेण्यासाठी कोर्टात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 6:13 AM

राज्य सरकारच्या मंजुरीशिवाय शुक्ला यांच्यावर पुढे कारवाई करणे शक्य नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावरील कारवाई बंद करण्यासाठी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला आहे. 

मुंबई : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासाठी कुलाबा पोलीस ठाण्याने पाठवलेला प्रस्ताव नुकताच सरकारने नामंजूर केला. राज्य सरकारच्या मंजुरीशिवाय शुक्ला यांच्यावर पुढे कारवाई करणे शक्य नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावरील कारवाई बंद करण्यासाठी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन बेकायदा टॅप केल्याबद्दल कुलाबा पोलीस ठाण्याने शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.  या प्रकरणी पोलिसांनी एप्रिलमध्ये २७०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. सरकारी कर्मचाऱ्याने कर्तव्याशी संबंधित गैरकृत्य केल्याचा आरोप असेल तर त्याच्यावर खटला चालवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे. या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र, सक्षम प्राधिकरणाकडून मंजुरी घेण्यात आली नाही. 

सुरुवातीला पोलिसांनी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्राधिकरणाच्या मंजुरीची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. कारण शुक्ला यांनी केलेले कृत्य पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्या कर्तव्याच्या कक्षेत येत नाही, असे म्हणणे होते. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यावर पोलिसांची भूमिका बदलली. शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यासाठी एप्रिल महिन्यात सरकारकडे प्रस्ताव पाठवला आणि दोनच दिवसांपूर्वी सरकारने पोलिसांनी पाठवलेला प्रस्ताव फेटाळला.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाCourtन्यायालय