शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

कल्पना गिरी खून प्रकरणात न्यायाधीशांकडे दाखल केला विनंती अर्ज

By admin | Published: August 12, 2016 10:50 PM

कल्पना गिरी या बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपींनी स्वत:हून नार्को टेस्ट करण्याची मागणी लातूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे एका विनंती अर्जाव्दारे केली

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 12- कल्पना गिरी या बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपींनी स्वत:हून नार्को टेस्ट करण्याची मागणी लातूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे एका विनंती अर्जाव्दारे केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच हे प्रकरण सीआयडीकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यातच आता खुद्द आरोपींनीच नार्को टेस्टची मागणी केली आहे.लातूर शहरातील काँग्रेसची कार्यकर्ती असलेल्या कल्पना मंगल गिरी ही २१ मार्च २०१४ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पक्षाच्या कार्यक्रमासाठी जाते म्हणून घराबाहेर पडली होती. ती संध्याकाळपर्यंत घरी परतली नाही म्हणून तिचा शोध घेत असतानाच कल्पना ही ज्या स्कुटीवर गेली होती. ती स्कुटी (एम. एच. २४ एस. १६७१) एका कार्यालयात आढळून आली होती. दरम्यान, २३ मार्च २०१४ रोजी तुळजापूर नजीकच्या पाचुंदा तलावात तिचे प्रेत तरंगताना आढळून आले. या प्रकरणी २७ मार्च २०१४ रोजी कल्पनाचे वडिल मंगल गिरी यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही तुरुंगात बंदिस्त आहेत. तर अन्य आरोपी जामीनावर आहेत. या प्रकरणात आपली नार्को स्टेस्ट, ब्रेन मॅपींग, पॉलीग्राफी टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबासमोर इन कॅमेरा करण्यात यावी, अशी मागणी तुरुंगात बंदिस्त असलेला महेंद्रसिंह विक्रमसिंह चौहाण याने लातूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशांकडे एका अर्जाव्दारे केली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वीच हा खटला सीआयडीकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.कायदेशीर बाबींना महत्व...न्यायालयात सुरु असलेल्या एखाद्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या बंदिवानास आपले म्हणणे मांडता येते. तो त्याचा अधिकार आहे. महेंद्रसिंह चौहाण याने केलेली नार्को टेस्टची मागणी कायद्याच्या चौकटीत आणि निकषात बसते का? ही मागणी कायदेशीर आहे का? याबाबत न्यायालय निर्णय घेईल. मात्र, अशी मागणी एखाद्या प्रकरणातील बंदिवानास करता येते, असे अ‍ॅड़ मोहनराव जाधव यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.