पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी साहित्य परिषदेच्या कार्यालयात गुरुवारी अर्ज दाखल केला. डॉ. श्रीपाल सबनीस, रवींद्र शोभणे आणि विठ्ठल वाघ यांनी अर्ज भरल्यामुळे आणि डॉ. शरणकुमार लिंबाळे, जनार्दन वाघमारे यांची नावे चर्चेत असल्याने संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.विठ्ठल वाघ यांनी पुण्यातून तर रवींद्र शोभणे यांनी विदर्भ साहित्य संघातून अर्ज भरला. वाघ यांच्या अर्जावर सूचक म्हणून उद्धव कानडे यांची स्वाक्षरी आहे. तर अनुमोदक म्हणून डॉ. अनु गायकवाड, मुकुंद आवटे, दिगंबर ढोकले, दत्तात्रय अत्रे आणि अॅड. विकास देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.नेमाडेंना सर्व मिळालेसाहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे, या ज्ञानपीठविजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता डॉ. नेमाडे यांना साहित्य क्षेत्रात सगळे मिळाले आहे, असा टोला वाघ यांनी लगावला.
विठ्ठल वाघ यांचा अध्यक्षपदासाठी अर्ज
By admin | Published: August 28, 2015 1:25 AM