शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आरटीईसाठी आजपासून स्वीकारणार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 5:48 AM

९,११३ शाळांची नोंद; १ लाख, १२ हजारांवर विद्यार्थ्यांना प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार ११३ शाळांनी नोंदणीकेली असून या शाळांमधील एक लाख १२ हजार ९५७ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी बुधवारपासून (ता.१२) आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाण्याची शक्यता आहे. तर मार्चमध्ये प्रवेशाची सोडत काढली जाईल,असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रकिया राबविली जात असून, काही दिवसांपासून राज्यातील शाळांची नोंदणी सुरू आहे.

त्यानुसार पुण्यातील सर्वाधिक ९२१ शाळांनी नोंदणी केली असून या शाळांमधील १६ हजार ५१ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. त्यात आणखी काही शाळांची वाढ होण्याची शक्यता आहे.पुण्यापाठोपाठ ठाणे, नागपूर आणि औरंगाबाद या शहरात आटीई प्रवेशासाठी नोंदणी करणाºया शाळांची संख्या मोठी आहे.

राज्य शासनाकडून शाळांना शुल्क परताव्याची रक्कम दिली जात नसल्याने शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी करण्यास नकार दिल्याचे दिसून आले आहे.परंतु, सर्व शाळांनी आरटीईमध्ये सहभागी व्हावे, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहे.

आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या शाळांची जिल्हानिहाय संख्या : यवतमाळ - २०० , वाशिम- ९९, वर्धा- १२२ , ठाणे- ६६८ , सोलापूर- ३२९, सिंधूदूर्ग- ५१ , सातारा- २३६ , सांगली- २२६ , रत्नागिरी- ९० , रायगड- २६२, पुणे- ९२१ , परभणी- १४७ , पालघर- २६९, उस्मानाबाद- १३१, नाशिक- ४४६, नंदुरबार- ४४, नांदेड- २३१ , नागपूर- ६७३ , मुंबई- २९२, लातूर- २३५, कोल्हापूर- ३४० , जालना- २५३ , जळगाव- २८६ , हिंगोली- ६९, गोंदिया- १४१, गडचिरोली- ६१, धुळे- १०३, चंद्रपूर- १९७, बुलढाणा- ९३, बीड - २२०, भंडारा- ९३, औरंगाबाद- ५४४, अमरावती- २४०, अकोला- २००, अहमदनगर- ३९३.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा