अकोला : राज्यातील शेतकर्यांनी सूक्ष्म सिंचनाचे महत्त्व ओळखले असून, या वर्षी प्रथमच या योजनेंतर्गत ठिबक, तुषार संच खरेदी करण्याकरिता राज्यातील १ लाख ३२ हजार १८६ शेतकर्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. अर्जाचा हा आकडा शेतकर्यांमध्ये जलसाक्षरता वाढल्याचे दर्शवितो. केंद्र सरकारने सुरू केलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेला सुरुवातीला शेतकर्यांचा तितकासा प्रतिसाद नव्हता. परंतु, पावसाची अनिश्चितता आणि पिकांचे होणारे नुकसान या सर्व पार्श्वभूमीवर शेतकर्यांना आता ही योजना भावली असून, या वर्षी कधी नव्हे एवढे अर्ज त्यांनी केले आहेत. विदर्भात सर्वाधिक १७,९६५ अर्ज बुलडाणा जिलतील शेतकर्यांनी केले. अकोला जिलतील ११,८७0, अमरावती १४,८६२, वाशिम ११,१२५, यवतमाळ १३,५३३, नागपूर ३,६३३, वर्धा ८,४६३, चंद्रपूर २,७४१, भंडारा ६४६, गोंदिया ३0३ आणि गडचिरोली जिलतील २७ शेतकर्यांनी ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केले आहे. विदर्भ सघन सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सूक्ष्म सिंचन संचासाठी विदर्भातील ८४,६६८ शेतकर्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने यावर्षी पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत राज्याला १७६ कोटी ७५ लाख रुपये दिले असून, राज्य शासन १११.४१ कोटी देणार आहे. म्हणजेच या वर्षी सूक्ष्म सिंचनासाठी राज्याला एकूण २८८ कोटी १६ लाख रुपये मिळणार आहेत; परंतु विदर्भातील मागील दोन वर्षांंतील या योजनेची रक्कम शासनाकडे थकली आहे. शेतकर्यांनी ठिबक, तुषार संच खरेदी करताना पूर्वपरवानगी घेतली नसल्याची सबब कृषी विभागाने पुढे केल्याने शेतकर्यांना ही रक्कम मिळाली नाही.
सूक्ष्म सिंचनासाठी सव्वा लाख शेतक-यांचे अर्ज!
By admin | Published: February 17, 2016 2:07 AM