शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

वाहन नोंदणी करवाढीस मंजुरी

By admin | Published: July 17, 2017 2:41 AM

राज्यात वाहन नोंदणी कर वाढीस मंजुरी मिळाली आहे. परिवहन आयुक्तांनी दिलेल्या मंजुरीप्रमाणे नवीन करांनुसार दुचाकीसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात वाहन नोंदणी कर वाढीस मंजुरी मिळाली आहे. परिवहन आयुक्तांनी दिलेल्या मंजुरीप्रमाणे नवीन करांनुसार दुचाकीसाठी ११ टक्के आणि चारचाकीसाठी १५ टक्के कर आकारण्यात येणार आहेत.जीएसटी लागू करण्याआधी दुचाकी आणि चारचाकी वाहन नोंदणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) आणि जकात नाका यांमधून राज्य सरकारला सुुमारे ७०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, जीएसटीमुळे या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. परिणामी, वाहन नोंदणी करांत वाढ होणे, हे अपेक्षित होते. नोंदणी करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कमाल कर मर्यादा २० लाखांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.सीएनजी वाहनांचा वापर वाढण्यासाठी केवळ त्या वाहनांच्या नोंदणीसाठी ७ टक्के कर आकारण्यात येणार आहे. पेट्रोल वाहन नोंदणी करांमध्ये ११-१३ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. डिझेल वाहन नोंदणीमध्ये १३-१५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जीएसटीपूर्वी पेट्रोल आणि डिझेल वाहन नोंदणी करापोटी अनुक्रमे ९-११ आणि ११-१३ टक्के भरावे लागत होते. नवीन कर प्रणालीमुळे राज्याला ७५० कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाहनांची इंजिन क्षमता, पेट्रोल, डिझेल व सीएनजी अशा वर्गवारीमध्ये नोंदणी कर आकारण्यात येणार आहे.