शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

टीडीआर देऊन बांधणार मत्स्यालय

By admin | Published: April 03, 2017 4:18 AM

मागील पाच वर्षापासून कागदावर असलेल्या मत्स्यालय प्रकल्प उभारणीच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग येण्याची चिन्हे आहेत.

अजित मांडके,ठाणे- मागील पाच वर्षापासून कागदावर असलेल्या मत्स्यालय प्रकल्प उभारणीच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग येण्याची चिन्हे आहेत. मात्र, आता हे मत्स्यालय विकासकास टीडीआर देऊन उभारण्याचा मानस पालिकेने व्यक्त केला आहे. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय असावे अशी संकल्पना २००३ सालीच मांडण्यात आली होती. त्यानंतर २०१३ मध्ये तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या कार्यकाळात त्याची औपचारिक घोषणाही करण्यात आली. आता यंदाच्या अर्थसंकल्पात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पाचे पुन्हा एकदा सुतोवाच केले. जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी तसेच अभ्यासकांना मत्स्यालय पाहण्यासाठी मुंबईला जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी ठाण्यात ते उभारण्याची कल्पना पुढे आली. बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर ते उभारण्यासाठी २०१३ मध्ये तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी पुढाकार घेतला होता. त्याकरिता महापालिकेने जाहिरात देऊन निविदादेखील मागवल्या होत्या. त्यानुसार आॅस्ट्रेलिया, दुबई, यासारख्या देशात मत्स्यालय उभारलेल्या चीनमधील चायना ओशन कंपनी आणि मुंबईतील प्रीव्हीजन मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपन्यांनी ते उभारण्याची इच्छा प्रकट केली होती. या कंपन्यांनी महापालिकेला प्रकल्प अहवालदेखील सादर केला होता. ज्युपिटर हॉस्पिटलजवळ असलेल्या १३ हजार स्केअर फुट जागेवर हे मत्स्यालय उभारण्यात येणार होते. तर उर्वरित जागेवर हॉटेल, मॉल अथवा इतर काही सुरु करण्यासाठी परवानगीही दिली होती. यातून जे उत्पन्न मिळणार होते, त्यातून संबधींत एजन्सी मत्स्यालयाचे मेन्टेनन्सही करु शकणार होती. या संपूर्ण बांधकामाच्या बदल्यात १ एफएससाय देण्याची मागणी एजन्सीकडून झाल्याने पालिकेने हा प्रस्तावाच गुंडाळून ठेवला. त्यानंतर केवळ अपुऱ्या जागेचा मुद्दा उपस्थित करून त्या संदर्भात नंतर कोणत्याही हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान आता आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुन्हा एकदा या प्रकल्पाची नव्याने घोषणा केली आहे. परंतु, आता हे मत्स्यालय बीओटीवर न बांधता विकासकास कंन्स्ट्रक्शनसासाठी टीडीआर देऊन उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. यासाठी कॅडबरी जंक्शन येथे सर्व्हिस रोडलगत प्राप्त होणाऱ्या १६ हजार चौ.मी. सुविधा भुखंडावर हे अत्याधुनिक स्वरुपाचे मत्स्यालय असणार आहे. टीडीआरच्या माध्यमातून मिळणारे चटईक्षेत्र विकून विकासकास त्यासाठी येणारा खर्च वसूल करता येणार आहे. परंतु, हा सुविधा भूखंड अद्यापही पालिकेला प्राप्त होऊ न शकल्याने त्या संदर्भातील प्रस्ताव पुढील आर्थिक वर्षात घेण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले आहे.>सल्लागारांवर लाखो रुपयांची उधळपट्टी 

मत्स्यालयाचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून अजूनही कार्यान्वयीत झाला नसला तरी या प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागारांवर ९३ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. त्यानंतर पुढच्या तीन वर्षांमध्ये या प्रकल्पासाठी १ कोटी ११ लाखांची तरतूद केली असली तरी प्रकल्पच पुढे सरकला नसल्याने एवढ्या मोठ्याप्रमाणात निधीची तरतूद करूनही हा तो खर्च होऊ शकलेला नाही. ज्युपिटरऐवजी आता रेमण्डच्या ठिकाणी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली : सुरु वातीला ज्युपिटर हॉस्पिटलच्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ही जागा अपुरी असल्याने आता रेमंडच्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्याचा पालिकेचा विचार सुरु आहे. यासंदर्भात प्राथमिक बोलणी सुरु असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. वर्षनिहाय प्रकल्पासाठी केलेली तरतूद वर्ष तरतूद खर्च २०१३-१४-९३ लाख २०१४-१५९ लाख २५ हजार २०१५-१६२ लाख -२०१६-१७१ कोटी -