शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

अर्धवटराव नाबाद १००...!

By admin | Published: September 25, 2016 1:31 AM

बोलक्या बाहुल्या म्हटले की, डोळ््यांसमोर येतात ते अर्धवटराव, आवडाबाई आणि या सगळ््या डोलाऱ्यामागे समर्थपणे उभे असणारे पाध्ये कुटुंबीय. दूरदर्शनपासून सुरू झालेला प्रवास

बोलक्या बाहुल्या म्हटले की, डोळ््यांसमोर येतात ते अर्धवटराव, आवडाबाई आणि या सगळ््या डोलाऱ्यामागे समर्थपणे उभे असणारे पाध्ये कुटुंबीय. दूरदर्शनपासून सुरू झालेला प्रवास देश-विदेशातील असंख्य कार्यक्रमातून शब्दभ्रमाची अनोखी कला जोपासण्याचा ध्यास पाध्ये कुटुंबीयांनी घेतला आहे. याच प्रवासादरम्यान या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असणाऱ्या ‘अर्धवटराव’ याने, नाबादपणे शंभर वर्षांचा प्रवास करीत शब्दभ्रम कलेच्या विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.रामदास पाध्ये यांचे वडील प्रा.यशवंत के. पाध्ये हे प्रसिद्ध शब्दभ्रमकार-जादूगार होते. त्या वेळी इंग्लंडहून आलेल्या शब्द भ्रमकाराच्या खेळामुळे ते खूपच प्रभावित झाले होते. आपणही हा खेळ करावा, असे त्यांना वाटले. त्यांनी कागदावरच १९१६ साली एका बाहुल्याचे पात्र साकारले. अशा रीतीने अर्धवटराव या पात्राचा जन्म झाला. त्याला त्या वेळी गप्पीदास-मि.क्रेझी अशीही नावे होती. मात्र, त्या वेळी शब्दभ्रमकारासाठी आवश्यक अशी साधने नव्हती. त्यामुळे त्यांनी कागदाच्या बाहुल्यांचे प्रयोग सुरू केले. कालानंतराने इंग्लंडहून सामान आणून अखेर या बाहुल्याचे प्रयोग सुरू झाले. त्यानंतर, अर्धवटरावाबरोबरच त्याची बायको आवडाबाई, त्यांची व्रात्य मुले शामू आणि गंपू यांचाही जन्म झाला. रामदास पाध्ये यांनी याची सूत्रे हाती घेतल्यानंतर, एन.बी.सी., ए.बी.सी., हाँगकाँग टीव्ही, अशा परदेशी वाहिन्यांप्रमाणेच देशा-परदेशात आत्तापर्यंत या बोलक्या बाहुल्यांचे तब्बल ९ हजार ८०० प्रयोग झाले.अर्धवटराव आणि आवडाबाई ही जोडी परिपूर्ण, समाधान देणारी अशी कलाकृती आहे. साध्या, मध्यमवर्गीय कुटुंबाचे प्रतिनिधित्व त्यातून व्हावे, या उद्देशाने यांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे ही जोडी पाहणाऱ्याला कधी परकी वाटलीच नाही, अजूनही वाटत नाही. हे त्या कलाकृतीचे यश आहे. परदेशात पपेट्री, वेंट्रीलोकिझमला प्रचंड ग्लॅमर आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचा एक ग्रह झाला आहे की, ही कला आपली नाहीच, परदेशातून आपण ही शिकलोय. हा ग्रह चुकीचा आहे, हे आपल्याला आणि त्या परदेशीयांनाही कळले पाहिजे, त्यांनी ‘उदो उदो’ केल्यावर एखाद्या आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीचे महत्त्व कळते, ही आपली मानसिकता झालीय. आपल्याकडे मात्र, या कलेला राजाश्रय मिळाला नाही. चित्रपटापासून ते अगदी मेकअपमन, वेशभूषाकार अशा सर्वांचेच सन्मान होतात. मात्र, आजमितीस कधीच कुठल्याही सोहळ््यात बाहुलीकाराचा सन्मान होत नाही, ही खंत पाध्ये कुटुंबीयांनी अर्धवटरावांच्या शतकी प्रवासानिमित्त व्यक्त केली.शब्दभ्रम कलेकरिता बाहुला बनविण्यासाठी एखादे काल्पनिक पात्र बांधायचे, तर त्यासाठीचे तांत्रिक काम हे प्रचंड असतेच. प्रामुख्याने डोळयांचे हावभाव, चेहऱ्यावरील अवयवांची प्रमाणबद्धता, सारेच फार एकाग्रतेने करावे लागते, पण त्याच्या माध्यमातून आपण कोणाचे प्रतिनिधित्व करतोय, हे स्पष्ट झाले की, त्याच्या चेहऱ्यावर ते सगळे मूर्त स्वरूपात आणणे हे तसे कठीण आणि आव्हानात्मक काम आहे. त्यासाठी व्यावसायिक कोर्सेसही केले. त्याचा उपयोग कलाकृती उत्तम साकारण्यात होतो. जिवंत व्यक्तींची कॅरेक्टर तयार करणे हेही आव्हानात्मकच. ती व्यक्ती खरे तर आपल्याला जेवढे माहीत असते, त्याहीपेक्षा जास्त अभ्यास हा करावाच लागतो. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात प्रचंड आदराची भावना असते. त्या वेळी त्याचे पात्र बांधताना किंवा ते परफॉर्म करताना हास्यास्पद होऊ नये, याची काळजी साहजिकच घेतली जाते. अशा वेळी आपले संस्कार आपल्या कलेतून दिसतात.पुढच्या पिढीला अर्धवटरावाची माहिती व्हावी, याकरिता ‘कॅरी आॅन एंटरटेन्मेंट-रामदास पाध्ये लाइव्ह’ या कार्यक्रमातून अर्धवटराव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पाध्ये यांच्या पत्नी अर्पणा, दोन मुले सत्यजित आणि परिक्षित, सून ऋतुजा असे संपूर्ण कुटुंब मिळून हा कार्यक्रम सादर करणार आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत हा कार्यक्रम पार पडणार आहे.