मुंबई : सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाच्या दोन कंपन्यांनी टाटा सन्सच्या विरुद्ध दाखल केलेल्या दोन अवमान याचिकांवरील निर्णय राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने १८ जानेवारीपर्यंत राखून ठेवला आहे.सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हटविल्याने लवादाच्या निर्देशांचा अवमान झाल्याचा आरोप याचिकांत करण्यात आला आहे. टाटा सन्स आणि रतन टाटा यांच्यासह कंपनीच्या अन्य संचालकांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर १८ जानेवारी रोजी निर्णय दिला जाईल, असे लवादाने म्हटले आहे. सायरस इन्व्हेस्टमेंटस् लि. आणि स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत. टाटा सन्सची नियोजित ६ फेब्रुवारीची विशेष सर्वसाधारण सभा रोखण्याचे आदेशही या याचिकांत मागितले आहे. मिस्त्री यांची चेअरमनपदावरून हकालपट्टी केल्याने या याचिका दाखल केल्या आहेत. (प्रतिनिधी)
मिस्त्रींच्या याचिकेवर लवादाचा निर्णय राखीव
By admin | Published: January 17, 2017 6:05 AM