६४ वे विदर्भ साहित्य संमेलन : महानुभाव साहित्य हीच खरी मराठी साहित्याची गंगोत्रीचक्रधरस्वामी साहित्य नगरी : पुरातत्व विभागाने शोधलेल्या अवशेषांमुळेच आपल्याला आपली लिपी, संस्कृती, जीवनपद्धती आणि इतिहास कळला. यातूनच साहित्याची निर्मिती झाली त्यामुळे पुरातत्त्व शास्त्राचा साहित्याशी जवळचा संबंध आहे. अनेकांकडे जुन्या प्राचीन पोथी आहेत. त्या पोथीचे पूजन करताना आपण त्यावर हळक, कुंकू, तीर्थ टाकतो. काही काळाने ही पोथी जीर्ण होते आणि त्यांनंतर ती पोथी विसर्जीत केली जाते. यामुळे आपला महत्वाचा इतिहास संपतो. काही लोकांनी या पोथ्यांचे जतन शास्त्रीय पद्धतीने केली त्यामुळेच आपली लिपी आणि संस्कृती कळली, असे मत पुरातत्व अभ्यासक डॉ. चंद्रशेखर गुप्ता यांनी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संमेलन, तळोधी येथे ‘पुरातत्वीय संस्कृती : वारसा आणि जतन’विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थनावरुन ते बोलत होते. याप्रसंगी वक्ते म्हणून डॉ. संगीता मेश्राम, डॉ. र. रा. बोरकर आणि डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे उपस्थित होते. डॉ. गुप्ता म्हणाले, अनेक पुरातत्त्वीय अवशेष लुप्त होत आहेत त्यामुळे अद्यापही आपल्या पुर्वजांचा संपूर्ण अभ्यास झालेला नाही. आपली संस्कृती आणि जीवनशैली अतिशय समृद्ध होती. शिवाजींचे किल्ले, प्राचीन स्थापत्यशास्त्र आणि पोथी लिहिण्यासाठी उपयोगात आणली जाणारी शाई प्रगत होती. ही शाई पाण्यात विरघळत नव्हती. त्यामुळेच संत तुकाराम महाराजांच्या ओव्या सापडल्य्ीाात. पुरातत्व शास्त्राकडे आपला इतिहास, पुर्वज, संस्कृती आणि जीवनपद्धतीचा अभ्यास या अंगाने पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले. जिल्हा स्तरावर पुरातत्वीय अवशेष सांगावेत मानवी जीवनाच्या समृद्धतेसाठी ज्या साधनांचा उपयोग झाला, त्यांचे जतन पी पुरातत्त्वीय संपदा आहे. इतिहास ज्ञात माहितीवर आधारलेला असतो तर पुरातत्त्व अज्ञात बाबींचा शोध घेते. पुरातत्त्वातूनच विविध संस्कृतीचा शोध लागला. जेथे पुरातत्त्वीय अवशेष नाहीत, असा कुठलाही भाग नाही. नागभीडला सात बहिणींचा डोंगर आहे तेथे प्राचीन पेटिंग्ज आहेत. सम्राट अशोक आणि प्रागैतिक ते वाकाटक काळापर्यंतचे पुरावे नागभीड आणि चंद्रपूर भागात आहेत. हा भग अतिशय समृद्ध असल्याचे पुरावे सापडले आहेत पण चंद्रपूरचा जिल्हा, मार्कंडा मंदिर, सात बहिणींचा डोंगर याकडे आपलेच दुर्लक्ष झाले आहे. आपल्या पुर्वजांचे संचित सांभाळताना नव्या पिढीला शालेय जीवनापासूनच मुलांना या विषयाची आवड लावावी, असे मत डॉ. र. रा. बोरकर यांनी व्यक्त केले. ग्रामस्थांमध्ये जागरुकता यावी गोसेखुर्दच्या प्रकल्पात काही नाणे सापडले आणि लोकांनी ते वाटून घेतले. त्यांना त्याचे महत्व कळले नाही. रामटेक परिसरातही उत्खनन झाले तेव्हा ग्रामस्थांना हे लोक सोने लुटून नेत आहेत, अशी भावना होती. याबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. मांढळच्या उत्खननात सापडलेल्या प्राचीन विटांचा उपयोग लोकांनी घर बांधकामासाठी केला. त्यामुळे संशोधनाचे अनेक प्रकल्प वेगवेगळ्या पातळ्यांवर अपूर्ण राहिले आणि आपल्याच इतिहासापासून आपण वंचित राहिलो. ही जागरुकता निर्माण करण्यासाठी प्राचीन व मध्ययुगीन इतिहास आणि पुरातत्त्व मुलांना शिकविण्याची गरज आहे. शाळेत हेरिटेज क्लब आणि जिल्हास्तरावर संग्रहालय असावे, असे मत डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराज उत्कृष्ट आर्किटेक्चरशिवाजी महाराज उत्कृष्ट अभियंता होते हा इतिहास फार सांगितला जात नाही. महाराजांनी समुद्रात जे किल्ले बांधले आहेत त्याच्या पायव्यात उपयोग आणलेले दगड खाऱ्या पाण्याने झिजले. पण दोन दगडांच्या फटीत जो चुना भरला आहे तो इतका पक्का आहे की, त्याला काहीही झाले नाही. त्यांच्या किल्ल्याच रचना आणि सुरक्षेचे उपाय आपल्याला थक्क करणारे आहे. याचा मात्र विचारही होत नाही. हे सारे पुरातत्त्वीय संशोधकांनी शोधून काढले आहे. या किल्ल्याचे जतन आवश्यक आहे, असे मत डॉ. संगीता मेश्राम यांनी व्यक्त केले. या परिसंवादाचे संचालन बबन गुरनुले यांनी तर आभार डॉ. कोकोडे यांनी मानले.
पुरातत्त्वीय अवशेषांनीच आपली संस्कृती कळली
By admin | Published: December 14, 2014 12:46 AM