भोसरी : ती येणार, नक्की येणार. भोसरीत येणार, ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेला तिचा व्हिडीओ यामुळे सगळ्या शहराचे लक्ष भोसरीतील दहीहंडी उत्सवाकडे लागले होते. उत्सुकता, उत्कंठा शिगेला पोहचलेली असतानाच... ती आली. व्यासपीठावर येताच सर्वांना अभिवादन केले. त्याचवेळी हजारोंच्या जनसमुदायातून एकच जल्लोष झाला आणि आर्ची आली आर्चीऽऽ अशी एक आरोळीच भोसरीत उमटली आणि प्रेक्षकांनी डीजेच्या तालावर सैराटच्या गाण्यावर एकच ताल धरला. गर्दी, रोषणाई व डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. आर्चीचे आगमन लांबत होते, तसतसे सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. साडेनऊ वाजता आर्ची, परशा व कलाकारांचे आगमन झाले आणि सगळीकडे एकच जल्लोष सुरू झाला. भोसरीत दहीहंडी म्हणजे दर वर्षी मराठी हिंदी चित्रपटातील तारका येण्याचा जणू पायंडाच पडला आहे. आजपर्यंत भोसरीत कुणाची किती लाखाची दहीहंडी, यासाठी स्पर्धाच लागलेली असायची. मग या स्पर्धेत एका सरस एक बक्षीसे देण्याची चूरस असायची. शेवटच्या दिवसांपर्यंत कोण काही करणार, हे सांगितले जात नसायचे. तो ट्रेंड आता बदलत चालला आहे. आमदार महेश लांडगे युवा मंच व भैरवनाथ कबड्डी संघ यांच्या वतीने पीएमटी चौक या ठिकाणी दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडी उत्सवाला सैराटची टीम येणार, ही चर्चा शहरभर पसरलेली असल्याने सायंकाळपासून भोसरीतील पीएमटी चौकात मोठी गर्दी झाली होती. भोसरीतील राजमाता उड्डाणपूल ते चौकातल्या व्यासपीठापर्यंत हजारो नागरिक दुर्तफा थांबले होते. अभिनेत्री स्वाती लिमये, रोमा देवी, स्वर्गा जोशी, ऋतिका पाटील, आमदार महेश लांडगे, योगेश लांडगे, भैरवनाथ कबड्डी संघातील सर्व खेळाडू उपस्थित होते.(प्रतिनिधी)>न्यायालयाचा आदेश : गोविंदांकडून उल्लंघनसुप्रीम कोर्टाने दहीहंडी उत्सवात २० फुटांपेक्षा जास्त उंच दहीहंडी बांधायची नाही व चारपेक्षा जास्त उंच मानवी मनोरा उभा करायचा नाही, अशी अट घातली आहे. मात्र, या नियमाची अंमलबजावणी बहुतांशी ठिकाणी झाली नाही. सहा थरांची दहीहंडी अनेक ठिकाणी पाहावयास मिळाली.होशीबाग मुंबई, विजय बजरंग मुंबई यांनी भोसरीतील दहीहंडी फोडली. बजरंग दल मंचर, शास्त्रीनगर धारावी, मुंबई, जय हनुमान लोणावळा, मुंबई, ठाणे, बारामतीमधून गोविंदा पथके दाखल झाली होती. शिवाय, अनेक ठिकाणी विजय बजरंग महिला गोविंदा पथक यांनीही सलामी दिली.नेहमीपेक्षा वाढलेली गर्दी, सैराटची क्रेझ असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवता येणे श्यक्य नव्हते. पोलीस सगळीकडे फिरत होते. >पिंपरी : दहीहंडीमध्ये नाचत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात धक्काबुक्की झाल्याचा प्रकार बलदेवनगर येथे गुरुवारी घडला़ त्यामुळे शहरातातील दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले़ दहीहंडीमध्ये उत्साहात नाचणाऱ्या दोन गटातील तरुणांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली़ नंतर त्याचे पर्यवसन धक्काबुक्कीत झाले़ गर्दीच्या वेळी अचानक झालेल्या या प्रकारामुळे लोकांमध्ये पळापळ झाली़ घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली़
आर्ची आली, आर्चीऽऽ
By admin | Published: August 26, 2016 1:25 AM