शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

सगळेच चोर आहेत का? विरोधकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:54 AM

पीकविमा भरताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही आॅनलाइनचा आग्रह धरता, सगळचे चोर आहेत का, असा सवाल विरोधकांनी राज्य सरकारला केला.

मुंबई : पीकविमा भरताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही आॅनलाइनचा आग्रह धरता, सगळचे चोर आहेत का, असा सवाल विरोधकांनी राज्य सरकारला केला. पीकविम्याला मुदतवाढ देण्याची जोरदार मागणीही त्यांनी केली.विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी पीकविमा योजनेच्या मुदतवाढीचा मुद्दा उपस्थित केला. आॅनलाइन अर्ज भरताना शेतकºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शेतकरी अठरा-अठरा तास रांगेत उभे आहेत. जामखेडला शेतकºयांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे ३१ जुलैची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. अर्ज आॅनलाइन भरण्यासाठी राज्य सरकारच्या सर्व्हरची ताकद तरी आहे का, असा सवाल करून शेकापचे जयंत पाटील यांनी केला. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे म्हणाले, सगळे जण चोर आहेत आणि सरकारची फसवणूक करीत आहेत, या भ्रमात सरकार योजनांची अंमलबजावणी करत आहे. आॅनलाइन अर्ज घ्यायचे होते, तर आधीपासूनच तशी व्यवस्था करणे आवश्यक होते.मोगलाई आहे का?१पीककर्ज विमा उतरविण्यासाठी गेले तीन दिवस शेतकरी रांगा लावून उभे आहेत, त्यांना लाठ्या घालण्याचे काम चालू आहे. ही काय मोगलाई लागून गेली का, अशा शब्दांत राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत सरकारवर हल्ला चढवला. पीकविम्याची मुदत वाढवून द्या, असे आपण गेल्याच आठवड्यात सांगितले होते, पण सरकारने ऐकले नाही. त्या वेळी ऐकले असते, तर आज दोन शेतकºयांचे हकनाव जीव गेले नसते, असेही पवार यांनी सुनावले.२तर शिवसेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा यांनी मराठवाड्यात मोठ मोठ्या रांगा आहेत, मुदत वाढ दिली नाही, तर राज्यात दंगे उसळतील, असे सांगून सरकारला घरचा आहेत दिला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीका करताना गेल्या वर्षी १ कोटी १० लाख शेतकºयांनी विमा उतरविला होता, या वर्षी मुदत संपत आली, तर फक्त १५ लाख शेतकºयांनी विमा उतरविला आहे. तुम्हाला शेतकºयांचे भले करायचे आहे की, विमा कंपन्यांचे खिसे गरम करायचे आहेत, असेही विखे म्हणाले.बँकांनी सहकार्यकेले नाहीपंतप्रधान पीकविमा ही योजना केंद्राची आहे. त्यानुसार, राज्यात ही योजना राबविली जाते. या योजनेसाठी २० जूनला जीआर निघाला, परिपत्रक काढले. सुरुवातीच्या पंधरा दिवसांत राष्ट्रीयकृत बँकांनी सहकार्य केले नाही, अशी कबुलीही त्यांनी या वेळी दिली. या बँकांनी शेतकºयांना वेठीला धरले. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.मृत शेतकºयाच्या कुटुंबीयांना पाच लाखपीकविमा भरण्यासाठी जात असताना, अपघाती मृत्यू पावलेल्या रामा पोत्रे या मृत शेतकºयांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत कृषिमंत्री फुंडकर यांनी जाहीर केली. मंचक इंगळे हा शेतकरी धर्मापुरी येथील बँक शाखेत अर्ज भरण्यासाठी जात होता. बँकेने त्याला धाटनांदूर येथील शाखेत जाण्यास सांगितले, पण वाटेतच त्याचा अपघाती मृत्यू झाला.