महाआघाडीतले 56 पक्ष रजिस्टर तरी आहेत का? मुख्यमंत्र्यांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 08:31 PM2019-03-24T20:31:56+5:302019-03-24T20:32:33+5:30

शरद पवारांनी कॅप्टनशीप मागे घेतली. नावात राष्ट्रवादी असून कामाचे नाही, मनात राष्ट्रवाद असावा लागतो. त्यांना उमेदवार सापडत नाहीय.

Are congress alliance 56 party are registered? Chief Minister's question | महाआघाडीतले 56 पक्ष रजिस्टर तरी आहेत का? मुख्यमंत्र्यांचा प्रश्न

महाआघाडीतले 56 पक्ष रजिस्टर तरी आहेत का? मुख्यमंत्र्यांचा प्रश्न

Next

कोल्हापूर : भाजपा आणि शिवसेनेची युती सत्तेसाठी नाही, विचारांची युती आहे. हिंदुत्ववादी पक्षांची युती असल्याचा अभिमान आहे. आघाडीत 56 पक्ष असल्याचे आठवले यांनी सांगितले. पण हे पक्ष रजिस्टर तरी आहेत का, कोणत्याही रस्त्यावरील संघटनेला उचलले आणि व्यासपीठावर बसविल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 


शरद पवारांनी कॅप्टनशीप मागे घेतली. नावात राष्ट्रवादी असून कामाचे नाही, मनात राष्ट्रवाद असावा लागतो. त्यांना उमेदवार सापडत नाहीय. या निवडणुकीतही एनडीएची सत्ता येणार. गरिबाची गरीबी कधी हटली नाही, काँग्रेसच्या सग्यासोयऱ्यांची गरीबी हटल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. 


जनधन खाती, शौचालये उभारली. महिलांना विचारा त्यांना किती वाईट वाटत होते, जेव्हा त्यांना बाहेर जावे लागत होते. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे गेले. आम्हाला साखर सम्राटांचे भले करायेचे नव्हते. चार वर्षाच्या काळात कोणालाही एफआरपीसाठी आंदोलन करावे लागले नाही. मोदींना पॅकेज दिले. 31 रुपयांचा कमीतकमी दर दिला. मोदी सुर्यासारखे आहेत. सुर्याकडे पाहून थुंकल्यास आपल्य़ाच चेहऱ्यावर पडते. यामुळे सावध असा. आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तर तुम्ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे. काही लोक राष्ट्रवादाचा कंपू सोडून चोरांच्या कंपूत सामिल झाले आहेत, असे राजू शेट्टी यांचे नाव न घेता फडणवीस यांनी टीका केली. 
 

Web Title: Are congress alliance 56 party are registered? Chief Minister's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.