मुंबई - पदवीधर झाल्यानंतर किंवा पदवीचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षा किंवा एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना अनेक विद्यार्थी दिसतात. त्यातच, विश्वास नांगरे पाटील, तुकाराम मुंडे, रमेश घोलप यांसारख्या युपीएससी पास अधिकाऱ्यांची भाषणे ऐकून आणि त्यांपासून प्रेरणा घेत हे विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतात. मात्र, एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षांची तयारी करताना रुममध्ये किंवा अभ्यासवर्गात विद्यार्थी काही अभ्यासाचे वेळापत्रक चिकटवतात. तर अनेकदा काही बोधवाक्येही लिहिलेली असतात. त्यामध्ये या पाच वाक्यांचा समावेश असायलाच हवा.
स्पर्धा परीक्षांकडे सध्या तरुणाईचा कल वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणही एमपीएससी आणि युपीएससी परीक्षांसाठी जीवाचे रान करताना दिसत आहेत. गावाकडून पुण्यात किंवा मुंबईत येऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करताना दिसतात. त्यासाठी स्पर्धा परीक्षांचे महागडे क्लासेसही लावले जातात. तर स्वतंत्र रुम करुन दिवसरात्र अभ्यास करतात. या अभ्यासाचे वेळापत्रकही विद्यार्थ्यांकडून तयार केले जाते. सोबतच, स्पर्धा परीक्षांमध्ये आदर्श असणाऱ्या अधिकाऱ्यांचे छायाचित्र रुममध्ये लावले जाते. तसेच काही कोट्स म्हणजे बोधवाक्येही रुममधील भिंतीवर चिकटवल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांच्या या बोधवाक्यात खालील पाच वाक्यांचाही समावेश असणे आवश्यक आहे. ज्येष्ठ साहित्यीक आणि लेखकांचे हे कोट्स नक्कीच विद्यार्थ्यांना प्रेरणा देतील.
प्रेरणादायी 5 वाक्ये
* कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असाव लागतं. - व.पु.काळे* जे अश्यक्य वाटतयं ते स्वप्न मला पाहायचयं, ज्या शत्रूचा कुणी पराभव करु शकत नाही, अशा शत्रूला मला हरवायचयं - विश्वास नांगरे पाटील* शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही - बाबा आमटे* स्वप्न ते नव्हे जे तुम्हाला झोपल्यानंतर पडते, खरे स्वप्न तेच जे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला सुखाने झोप लागत नाही - एपीजे अब्दुल कलाम* जो मुश्कील हालात मे नही तुटते, वो रेकॉर्ड तोड देते है - आयएएस रमेश घोलप