शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
2
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
3
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
4
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
5
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
6
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
7
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
9
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
11
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
12
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
13
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
15
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
16
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
17
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
19
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
20
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

अकोल्यात सशस्त्र संघर्ष; एकाची हत्या

By admin | Published: June 26, 2014 1:54 AM

काँग्रेस नगरसेविकेच्या पतीसह तीन जखमी

अकोला - पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या सशस्त्र संघर्षात मंगळवारी रात्री एकाची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात काँग्रेस नगरसेविकेच्या प तीसह तीन जण जखमी झाले. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अकोल्यातील टिळक रोडवरील मंगलदास मार्केटमध्ये मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास गवळीपुर्‍यात राहणारे शेख अक्रम शेख बुरहान नौरंगाबादी, शेख सलिम शेख बुरहान, शेख अली, अकोला महापालिकेतील काँग्रेस नगरसेविकेचे पती महेबूब खान उर्फ मब्बासह काही जण उभे होते. यावेळी पूर्ववैमनस्यातून त्यांच्यावर सहा जणांनी हल्ला केला. मध्यस्थीसाठी गेलेल्या महेबूब खानवरही आरोपींनी तलवारीने हल्ला केला. जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रथमोपचारानंतर जखमींना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी शेख सलीम शेख बुरहान यांच्या फिर्यादीवरून, रामदासपेठ पोलिसांनी शेख सुलतान शेख यासिन, शेख साजिद शेख सुलतान, शेख रशिद शेख सुलतान, शेख नईम, मो. आरिफ मो. आमद, (सर्व. रा. मरगट) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३0७ (प्राणघातक हल्ला), १४३, १४७, १४८, १४९, (गैरकायद्याची मंडळी जमा करणे) ५0४ (धमकी देणे) अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, शेख अक्रमचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे गवळीपुरा परिसरात तणाव निर्माण झाला. शेख अक्रमचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आला. त्यावेळी गवळीपुर्‍यातील युवकांनी रुग्णालयात धाव घेतली. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रूग्णालयात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. शहर पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, वाहतूक निरीक्षक शिवसिंग ठाकूर, कोतवालीचे ठाणदोर अनिरुद्ध अढाऊ, रामदासपेठचे एपीआय शिरीष खंडारे, हेकॉँ. सुरेश वाघ यांनी कर्मचार्‍यांसह धाव घेऊन रूग्णालयातील परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, उर्वरित हल्लेखोरांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.