शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

सेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर

By admin | Published: September 16, 2015 1:12 AM

महापालिका निवडणूक : विनायक राऊत मुलाखती अर्ध्यावरच सोडून गेले ?

कोल्हापूर : शिवसेनेतील शहरांतर्गत नेत्यांतील वाद मिटला असल्याच्या कितीही वल्गना वरिष्ठ नेते करत असले तरी इच्छुकांच्या मुलाखती सुरू असतानाच हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. मुलाखती घेण्यासाठी आलेले शिवसेनेचे खासदार विनायक राऊत मुलाखती अर्ध्यावरच सोडून निघून गेल्याबाबतची चर्चा पक्षाच्या प्रचार कार्यालय परिसरात सुरु होती. राऊत गेल्यानंतर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी उर्वरित मुलाखती घेतल्या. महापालिका निवडणुकीत मतदानाची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरीही सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती सुरुकेल्या आहेत. शिवसेनेने सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवसांत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु होत्या. गेल्या सात-आठ वर्षांत शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांत असणाऱ्या वादाचा परिणाम या महापालिका निवडणुकीवर जाणवत आहे. गेल्या निवडणुकीवर या वादाचा परिणाम झाला. त्यावेळी अनेकांनी गटबाजीतून उमेदवारी जाणून-बुजून डावलल्याचा आरोप केला होता. त्याचा परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला होता. यंदाच्या निवडणुकीतही या वादाचे पडसाद तसेच परिणाम होऊ नये म्हणून वरिष्ठ नेत्यांनी पातळीवरील नेत्यांनी हा वाद मिटविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळणार, असेही नेत्यांनी पुन्हा -पुन्हा ठासून सांगितले. दरम्यान, विनायक राऊत यांनी सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांना थेट बजावून मुलाखती पूर्ण झाल्यानंतर अहवाल मुंबईला घेऊन येण्याचे बजावले आणि ते दुपारीच मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर काहीवेळ मुलाखती थांबल्याचे समजते, त्यानंतर पुन्हा मुलाखती सुरू करून सोमवारी रात्री उशिरापर्यंत पहिल्या टप्प्यातील मुलाखती पूर्ण केल्या पण ही घटना मुलाखत सुरू असलेल्या बंद कक्षात घडल्याने त्याची उशिरा चर्चा प्रचार कार्यालय परिसरात सुरू होती. ते निघून गेल्याने मंगळवारच्या दुसऱ्या टप्प्यांतील मुलाखती संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पूर्ण केल्या सोमवारी पक्षाच्यावतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतानाच गटबाजीचे दर्शन खासदार राऊत यांनाच दिसून आले. या मुलाखतीवेळी कक्षात आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, दुर्गेश लिंग्रस आदींचा समावेश होता. शहरांतर्गत नेत्यांच्या दोन्ही गटांचा इच्छुक उमेदवारांत समावेश होता. मुलाखती घेण्याची प्रमुख भूमिका खासदार राऊत हे बजावत होते तर दोन्हीही गटांचे नेतेही आपल्या शिलेदारांना घेऊनही मुलाखत दालनात इच्छुकांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत होते. मात्र, स्थानिक नेत्याने विरोधी गटाच्या इच्छुकाला प्रश्न विचारताना उंची आवाजात प्रश्न विचारत असल्याचे खासदार राऊत यांच्या निदर्शनास आले. ही परिस्थिती स्थानिक दोन्हीही गटांकडून दिसून आल्याने खासदार राऊत हे वैतागले. त्यांनी ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर दोन्हीही नेत्यांना खडसावले. त्यानंतर त्यांनी काहीवेळ मुलाखती थांबवल्या.