भरत उबाळेआसनगांव - मोठ्याप्रमाणात औद्योगिकीकरणासह शहरीकरणामुळे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तसेच आसनगांव येथे तीव्र पाणी जाणवू लागल्याने येथील रहिवाशी शेवटी पाणीटंचाईला कंटाळून घरे सोडू लागले आहेत. आसनगांवच्या तुळशी विहार, निर्मल नगर, कुणबी नगर, संभाजीनगर, औद्योगिक वसाहत येथे पाणीटंचाईने गंभीर स्वरु प धारण केले आहे. आसनगांव नळपाणीपुरवठा योजना कोलमडून पडली आहे. पाणीटंचाईला त्रासलेले रहिवाशी येथील वास्तव्य सोडून अन्यत्र स्थलांतर करु लागले आहेत. आता पर्यंत ११० घरांना कुलूप लागले आहे़ शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आऱ डी़ धादवड म्हणाले की, शहरीकरण वाढीस लागल्याने येथील पाण्याची गरज वाढली आहे़ मात्र, यासाठी अतिरिक्त निधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासन दरबारी स्थगित आहे़आसनगांव औद्योगिक वसाहतीत पाच हजाराहून अधिक कारखाने असून आम्हांला नळजोडणी नाही़ पाण्याअभावी आमचे उद्योग संकटात आले आहेत़ अनेक उद्योग स्थलांतरीत होत आहेत़ आमच्या प्रश्नांसाठी राजकीय नेत्यांना वेळ नाही, असा आरोप शहापूर मॅन्युफॅरर्स असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी विनोद विशे यांनी केला. ( वार्ताहर)--* जमिन विकसित करु न घरे विकणार्या बिल्डरांना येथे पाणीटंचाईचा जोरदार फटका बसला आहे. * आसनगांव मध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होऊनही औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे २० वर्षापासून अद्याप नळजोडणी देण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील कारखानदार गेली २० वर्षे खासगी टँकरचेच पाणी वापरीत आहेत़ * पाणी टंचाईत होरपळणार्या रहिवाशांना, बिल्डरांसह लघु उद्योजकांना खाजगी टँन्करने होणा-या पाणीपुरवठ्याचा आसरा घ्यावा लागत असल्याने टँन्कर लॉबीचे येथे वर्चस्व वाढले आहे.
पाणीटंचाईने त्रस्त ११० कुटुंबांनी आसनगाव सोडले
By admin | Published: May 13, 2014 6:13 PM