लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना तीन टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने गुरुवारी घेतला. त्यानुसार १ जानेवारी २०१९ पासून ३० जून २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता ९ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. तीन टक्के महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम जानेवारी २०२१ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 6:04 AM