ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 2 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. न्यायालयीन कामकाजासाठी राज ठाकरे उपस्थित राहात नसल्याने अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अनिता कुरणे यांच्या न्यायालयाने हे अटक वॉरंट काढलं आहे.
2008 साली राज ठाकरेंनी उत्तर भारतीयंविरोधात चिथावणीखोर भाषण केलं होतं. त्याचा परिणाम राज्यासह अंबाजोगाईतही पाहायला मिळाला होता. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही बसेसची तोडफोड केली होती.
बसेसची तोडफोड केल्याप्रकरणी राज ठाकरेंसह दहा जणांविरुद्ध गु्न्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी राज ठाकरे न्यायालयीन कामकाजासाठी सातत्याने गैरहजर राहत असल्याने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.