अलिबाग : स्वत: विवाहित असतानाही रायगड पोलीस दलातील प्रशिक्षणार्थी महिला कॉन्स्टेबलला लग्नाचे आमिष दाखवून प्रथम नागपूर येथे त्यानंतर रायगड पोलीस मुख्यालयातील त्याच्या रूमवर बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लिप करून त्या आधारे बदनामी आणि ठार मारण्याच्या धमक्या देऊन अनेकदा बलात्कार करणारा रायगड पोलीस दलातील प्रशिक्षक पोलीस शिपाई नागेश पोपट गावडे याच्याविरुद्ध शनिवारी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर रात्रीच पुणो जिल्ह्यातील त्याच्या दौंड येथील घरातून अलिबाग पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेवून, रविवारी दुपारी 12.45 वाजता त्यास अटक करण्यात आली असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याच्या सूत्रंनी दिली आहे.
अलिबाग पोलिसांनी नागेश गावडविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत चौधरी करीत आहेत. गावडेला उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. आपल्यावर होणा:या अत्याचार आणि मानसिक त्रसाबाबत पीडित प्रशिक्षणार्थी महिला कॉन्स्टेबलने हा प्रकार अनेकदा आपल्या वरिष्ठांना लेखी कळविला होता. हा अत्याचार असह्य झाल्याने 3 ऑक्टोबर 2क्13 रोजी आपल्या वरिष्ठांकडे तक्रार अर्ज केला होता. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. तिच्या वडिलांना सातारा एसटी स्थानकावर गावडेने बोलावले आणि तेथे वडिलांना देखील मारहाण केली. मात्र त्याबाबतही चौकशी वा कारवाई झाली नाही. अखेर तिने 1 जानेवारी 2क्14 रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरही अलिबाग पोलिसांनी कोणतीही चौकशी वा कारवाई केली नाही, अशी शोकांतिका या पीडित प्रशिक्षणार्थी महिला कॉन्स्टेबलने ‘लोकमत’कडे व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी )
फिर्याद घेण्यासही टाळाटाळ झाल्याचा आरोप
पीडित प्रशिक्षणार्थी महिला कॉन्स्टेबल हिची अलिबाग पोलीस ठाण्यात प्रथम फिर्याद घेण्यासही टाळाटाळ करण्यात येत होती. अलिबाग पोलिसांनी फिर्याद घेतली नाही तर थेट मुंबईत जाऊन वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्याचा पवित्र घेतल्यावर ही फिर्याद दाखल करून घेण्यात आल्याचे मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष महेष पोरे यांनी सांगितले. पीडित प्रशिक्षणार्थी महिला कॉन्स्टेबलच्या पाठीशी आम्ही ठामपणो उभे राहाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.