नवी मुंबई : खांदेश्वर रेल्वे स्टेशनसमोर रिव्हॉल्व्हर व गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या अनिल औधराज चौहान या आरोपीस गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून १ रिव्हॉल्व्हर, ६ गावठी कट्टा व ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे अधिकारी किरण भोसले यांना शस्त्रविक्री करण्यासाठी एक आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ७ जूनला सापळा रचून पोलिसांनी अनिल चौहानला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे १ रिव्हॉल्वर, ६ गावठी कट्टे व ५ काडतुसे असा एकूण ७७ हजार रूपये किमतीचा ऐवज सापडला आहे. आरोपी मूळचा उत्तरप्रदेशमधील रहिवासी असून सद्यस्थितीमध्ये मानखुर्द मंडाला परिसरात वास्तव्य करत आहे. त्याच्यावर मुंबईमध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, चोरी, घरफोडी, जबरी दुखापत व एनडीपीएस अॅक्टप्रमाणे ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपआयुक्त दिलीप सावंत, सहायक आयुक्त नितीन कौसाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपीने यापूर्वी अजून कोणाला शस्त्र पुरविली आहेत. गुन्ह्यामध्ये अजून कोणाचा समावेश आहे याचा तपास सुरू आहे.७७ हजारांचा ऐवज सापडलादेशी बनावटीचे १ रिव्हॉल्व्हर, ६ गावठी कट्टे व ५ काडतुसे असा एकूण ७७ हजार रूपये किमतीचा ऐवज सापडला आहे. आरोपी मूळचा उत्तरप्रदेशमधील रहिवासी असून सद्यस्थितीमध्ये मानखुर्द मंडाला परिसरात वास्तव्य करत आहे.
बेकायदेशीरपणे शस्त्र विकणाऱ्यास अटक
By admin | Published: June 10, 2016 2:49 AM