नाशिक : गुलाबी थंडीची चाहूल लागताच देशी-विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांच्या किलबिलाटाने राज्याचे ‘भरतपूर’ म्हणून नावलौकिक मिळविणारे नांदूरमधमेश्वर (चापडगाव) पक्षी अभयारण्य गजबजण्यास सुरूवात होते. या पाश्वर्भूमीवर वनखात्याच्या वन्यजीव विभागाकडून मंगळवारी (दि.३१) पक्षी गणना करण्यात आली. विविध जातीचे देशी-विदेशी अशा १९ हजार ५२६ पक्ष्यांची नोंद यावेळी पक्षीनिरिक्षकांकडून नोंदविण्यात आली. एकूणच ‘भरतपूर’च्या हिवाळी संमेलनाला सुरूवात झाली असून अभयारण्याचा परिसरात विविध पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडू लागला आहे.
राज्याच्या ‘भरतपूर’मध्ये पक्ष्यांचे आगमन; १९ हजार पक्ष्यांची गणनेत नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 8:20 PM
वनविभाागच्या वन्यजीव खात्याच्या नियंत्रणात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधार्याच्या बॅकवॉटरला चापगाव शिवारात पक्षी अभयारण्य विकसीत करण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेले हे अभयारण्य जांभळ्या पाणकोंबडीसह राखी बगळा (ग्रे-हेरॉन), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन), मोठा रोहित (फ्लेमिंगो), कॉमन क्रेन (करकोचा), रंगीत करकोचा (पेंटेड स्टॉर्क ), मार्श हॅरियर यांसह बदकाचे विविध जातींसाठी प्रसिध्द.
ठळक मुद्दे मंगळवारी (दि.३१) पक्षी गणना करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधार्याच्या बॅकवॉटरला चापगाव शिवारात पक्षी अभयारण्य