शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : खासकरून युरोप आणि दक्षिण आफ्रीका येथे आढळणाऱ्या ग्रेटर फ्लेमिंगो पक्षांचे वसईत सलग सहाव्या वर्षी आगमन झाले आहे. त्यांच्यासबोत यंदा अनेक भारतीय स्थलांतरीत पक्षांचेही आगमन झाले आहे. त्यामुळे वसईतील खाडीलगत सध्या रंगीबेरंगी पक्ष्यांचे थवे मनमोहून घेताना दिसतात. पावसाळा लांबल्याने पक्ष्यांंचे आगमन लांबले असले तरी आणखी स्थलांतरीत पक्षी याठिकाणी येणार असून त्यांचा मुक्काम दोन -अडीच महिने असणार आहे.पावसाळा सुरु झाल्यानंतर वसई-नायगाव दरम्यान, उमेळा-पापडी रस्ता, गास-चुळणे रस्ता, गोगटे सॉल्ट येथील खारटण भागात पाण्याची पातळी वाढते. यात शेवाळे, पाणकिडे, छोटे मासे हे आवडेत खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने दरवर्षी फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर येत असतात. आता त्यात चमचे करकोचे, उघड चोच करकोचे, राखी बगळÞे, जांभळे बगळे, ब्राम्हणी घारी, शेकाचे, किंगफिशर, शारटी, कुदळ््या, वारकरी बदक आणि सुरय या भारतीय स्थलांतरीत पक्ष्यांची भर पडली आहे. पावसाळ््यात गुजरात मधुन जास्त प्रमाणात फ्लेमिंगो येत असावेत असा अंदाज नेचर अॅडव्हेंचर सोसायटी आॅफ ठाणेचे अध्यक्ष सचिन मेन यांनी सांगितले. खारटण भागात पाण्याची पातळी वाढल्यानंतरच स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन होत असते. यंदा पावसाळा लांबल्याने या पक्ष्यांचे आगमनही लांबले आहे. येत्या दहा-पंधरा दिवसात वसई -उमेळा रस्ता, गास-चुळणे सनसिटी रस्ता, गोगटे सॉल्ट आणि वसई-नायगाव दरम्यान खारटण भाग रंगीबेरंगी पक्ष्यांनी फुलून जाणार आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे पक्षी पुन्हा परततात. साधारण सप्टेंबर ते आॅक्टोबर दरम्यान पक्षी निघून जातात. पक्ष्यांवर मानवी आक्रमणवसईत हजारोंच्या संख्येने येत असलेले देशी-विदेशी पक्ष्यांना आता स्थानिक लोक लक्ष्य करू लागले आहेत. आदिवासी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्यांनी अन्न म्हणून या पक्ष्यांकडे पहावयास सुरुवात केली आहे. त्यातून दररोज अनेक पक्ष्यांची शिकार केली जात आहेत. तसेच मातीच्या भरावामुळे पक्ष्यांना असुरक्षित वाटून त्यांचे स्थलांतर बंद होण्याची भिती पक्षीमित्र सचिन मेन यांनी व्यक्त केली.सहा इंच चोचीचे फ्लेमिंगोवसईत सध्या फ्लेमिंगोसह अनेक देशी स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन सुरु झाले आहे. चार फूट उंचीचे, गुलाबी रंगाचे, सहा इंच चोचीचे रुबाबदार फ्लेमिंगो हेच येथील मुख्य आकर्षण आहे. फ्लेमिंगो दक्षिण आफ्रिका आणि युरोपमध्ये आढळून येतात. कच्छ रण येथे फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे गुजरातचा राज्य पक्षी म्हणून फ्लेमिंगोची ओळख बनली आहे.
वसईत स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन
By admin | Published: July 15, 2017 3:02 AM