- सचिन लुंगसे, मुंबई
दुष्काळझळा आणि उष्णतेच्या लाटेमध्ये अवघे राज्य होरपळत आहे. तथापि, मॉन्सून सरी कोसळण्यासाठी १० जूनपर्यंत तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. केरळमध्ये १ जूनला तर मुंबईसह महाराष्ट्रात १० जूनला मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी चार दिवस अगोदर मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.गेल्यावर्षी देशात सरासरीच्या १४ टक्के पाऊस कमी झाला होता. तर महाराष्ट्रासह मध्य भारतात गेल्यावर्षी सरासरीच्या १६ टक्के कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे राज्यासह देशाच्या बहुतेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून मॉन्सूनचे भारतातील आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेले आहे. त्यामुळे तो पुढे महाराष्ट्रात येण्यासही जूनचा दुसरा आठवडा उजाडला होता. यंदा मात्र चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...तर मान्सूनची वाट अडू शकतेगोव्यापर्यंत मान्सून आल्यानंतर मुंबईत दाखल होण्यासाठी त्याला ७२ किंवा ४८ तासांचा कालावधी लागतो. वातावरणातील बदलानंतर मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदरात तो काही दिवस अडकू राहू शकतो.मान्सूनचा प्रवास २० मे : अंदमान व निकोबार २५ मे : श्रीलंका, गुवाहटी : १ जून : तिरुअनंतपूरम, चेन्नई५ जून : पणजी, हैदराबाद १० जून : मुंबई, नागपूर, कोलकाता, पाटना१५ जून : अहमदाबाद, वाराणसी २९ जून : दिल्ली, शिमला, श्रीनगर १ जुलै : चंदीगड अशी आहे शक्यता... पावसाची तूट - १ टक्का, सरासरीपेक्षा कमी - ५ टक्के, सरासरी एवढा - ३० टक्के, सरासरीपेक्षा अधिक : ३४ टक्के, मुसळधार : ३० टक्केदेशाच्या उत्तरेकडील भागातील वातावरणात द्रोणीय क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे देशासह राज्यातील शहरांच्या कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे. १० जूनपर्यंत मॉन्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होईल.-शुभांगी भुते, संचालक, मुंबई प्रादेशिक हवामान खाते