शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

मनोरुग्णांचे कलागुण पुन्हा एकदा उमलणार

By admin | Published: May 21, 2016 3:31 AM

मनोरुग्णालयातील गेले आठ महिने बंद पडलेले डे केअर सेंटर लवकरच पुनरुज्जीवित होणार

प्रज्ञा म्हात्रे,

ठाणे- प्रादेशिक मनोरुग्णालयातील गेले आठ महिने बंद पडलेले डे केअर सेंटर लवकरच पुनरुज्जीवित होणार आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून हे सेंटर पुन्हा उभे केले जाणार आहे. त्यामुळे त्याचा लाभ घेणाऱ्या रुग्णांना दिलासाच मिळणार आहे. त्यांच्यातील कलागुण फुलवण्यास याचा आधार मिळणार आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात. त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यावरील ताण कमी व्हावा, यासाठी त्यांचे मन कशात तरी गुंतावे म्हणून त्यांना विविध कला शिकवल्या जातात. त्यांना व्यक्त होण्याचे व्यासपीठही उपलब्ध करून दिले जाते. जे मनोरुग्ण प्रादेशिक मनोरुग्णालयातून उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत, अशांसाठी साधारण तीन ते चार वर्षांपूर्वी एनआरएचएम योजनेंतर्गत डे केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. बरे होऊन गेलेल्या रुग्णांच्या अंगी दडलेली कला विकसित करण्याचे काम येथून केले जात असे. या सेंटरचा लाभ बाहेरचे रुग्णही घेत असत. विशेषत: यात ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग अधिक होता. दिवसाला ४० रुग्ण या सेंटरमध्ये येत असत. त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जात. त्यांना विविध कला शिकवल्या जात. या रुग्णांसाठी मानसोपचारतज्ज्ञ, आॅक्युपेशनल थेरपिस्ट काम करीत होते. त्यांना शासनाकडून येणारे मानधन कालांतराने मिळणे बंद झाले. त्यामुळे हे सेंटरही बंद झाले. हे सेंटर सुरू केले तेव्हा देणगीदार पुढे येतील, अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली आणि या सेंटरमध्ये काम करणाऱ्या स्टाफच्या मानधनाचा प्रश्न उभा राहिला. आठ महिन्यांपूर्वी हे सेंटर बंद पडले. मात्र, आता हे सेंटर पुनरुज्जीवित करण्यासाठी ठाण्यातील ‘आयपीएच’ ही संस्था पुढे आली आहे. स्टाफपासून सर्व सपोर्ट सिस्टीम ही संस्थाच पुरवणार आहे. त्यामुळे बंद पडलेले हे सेंटर पुन्हा एकदा उभारी घेण्यास सज्ज झाले आहे.