शासनविरोधी घोषणानागपूर : शासन निर्णयानुसार पात्र घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळांना निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मुप्टा महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर संघटनेच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढून अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.मुप्टा महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर संघटनेचा मोर्चा यशवंत स्टेडियमवरून निघून मुंजे चौक, अभ्यंकर रोड, व्हेरायटी चौक या मार्गाने मॉरिस कॉलेज टी पॉईंट येथे पोहोचला. येथे हा मोर्चा पोलिसांनी अडवून धरला. मोर्चात सहभागी शिक्षकांनी शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करून आपल्या मागण्या रेटून धरल्या. मोर्चात अनुदानासाठी पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक मराठी शाळांची शिक्षण सचिव स्तरावरील फेर पडताळणी त्वरित रद्द करावी आदी मागण्या करण्यात आल्या. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चात सहभागी सर्व शिक्षकांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केले. नेतृत्व शिवराम मस्के, शामसुंदर कनके, के. आर. मुळीकमागण्या अनुदानासाठी पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक मराठी शाळांना निधी उपलब्ध करून द्यावा.अनुदानासाठी पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक मराठी शाळांची शिक्षण सचिव स्तरावरील फेर पडताळणी रद्द करावी.शासन निर्णयाव्यतिरिक्त मूल्यांकन झालेल्या शाळांची पात्र किंवा अपात्र यादी जाहीर करावी.२०१४ मध्ये पात्र ठरलेल्या सर्व शाळांना ४० टक्के अनुदानाचे पत्र वितरित करावे.
अनुदानासाठी शिक्षकांचे अर्धनग्न आंदोलन
By admin | Published: December 12, 2014 12:29 AM