खालापूर : चित्रकार दीपक पाटील यांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील आपल्या प्रदर्शनात व्यग्र असल्यामुळे त्यांनी आपले मौल्यवान साहित्य एका संस्थेच्या खोलीत ठेवले होते. त्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार दीपक पाटील हे खोपोली शहरातील केटीएसपी संस्थेच्या कला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. अलीकडे दीपावली उत्सवात पाटील यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत भरले होते. त्या वेळी त्यांच्याकडे असलेली लाखो रुपयांची पेंटिंग्ज त्यांनी पाटणकर वाडा येथे असणाऱ्या महाविद्यालयाच्या एका खोलीत ठेवली होती. त्यांना पुरातन वस्तू जमविण्याचाही छंद आहे. त्यांनी पितळेच्या किमान १०० भांड्यांचा संग्रह केला आहे. ही भांडी विशेष धाटणीची आणि महागडी होती. चोरांनी हीच भांडी खोलीची खिडकी तोडून लंपास केली आहेत. याबाबत पाटील यांनी खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
चित्रकार दीपक पाटील यांचे साहित्य चोरीला
By admin | Published: November 06, 2014 4:06 AM