भार्इंदर : रामाचा जन्म सध्याच्या रामजन्मभूमीतच झाला असून, राम मंदिर तिथेच बनेल. मात्र, त्याचा निर्णय साधुसंत घेतील; आणि संघ त्यांच्यासोबत असेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय संघ प्रचारप्रमुख अरुणकुमार यांनी सोमवारी केशवसृष्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.३१ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक केशवसृष्टी येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत या विचारांवर चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीत सात विविध संघटनांचे कार्यवाहक, संघटक सचिव, प्रचारप्रमुख आदी सहभागी होतील.बैठकीत राम मंदिर निर्माण आणि देशातील घडामोडींचाही ऊहापोह केला जाईल. रामजन्मभूमीत पूर्वी राम मंदिरच होते. त्यावर कुणीतरी अन्य बांधकाम केले. त्यातून रामजन्मभूमी रामाचीच असल्याचे सिद्ध झाले असले, तरी सध्या जागेचा वाद कायम आहे. हा वाद न्यायालयाने सोडवावा किंवा केंद्र सरकारने कायदा बनवून राम मंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी त्यांनी केली. मंदिराच्या निर्मितीसाठी संघ आग्रही असून त्याबाबत निर्णय रामभक्त साधुसंत घेतील आणि संघ त्यांच्या सोबत राहील, असेही अरुणकुमार म्हणाले.
'रामजन्मभूमीचा निर्णय साधुसंत घेतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 5:16 AM