लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार-२०१७ जाहीर झाले आहेत. ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांना जीवनगौरव तर ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर यांना मुद्रित माध्यमातील उत्कृष्ट संपादक पुरस्काराने गौरविले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया या श्रेणीत ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर (मुंबई), आंतरराष्ट्रीय पत्रकारिता- जय देशमुख (मुंबई), राष्ट्रीय पत्रकारिता- सुनील चावके (नवी दिल्ली), शोध पत्रकारिता- निशांत सरवणकर (मुंबई), कृषी पत्रकारिता - विजय गायकवाड (मुंबई), ई-मीडिया- राम जगताप (मुंबई), सामाजिक पत्रकारिता- न. मा. जोशी (यवतमाळ) तर महिला-सामाजिक पत्रकारिता या पुरस्कारासाठी दीपा कदम (मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष आ. डॉ. आशिष देशमुख यांनी दिली. पुरस्कारांचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे.
‘लोकमत’चे द्वादशीवार, बाविस्कर यांना अरविंदबाबू देशमुख पुरस्कार जाहीर
By admin | Published: June 24, 2017 3:24 AM