Aryan Khan Case: आर्यन खान प्रकरणात मुंबई झोनच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत सापडले आहेत. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करणे त्यांना बोजड झाले आहे. सीबीआयने वानखेडेंविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात न गोवण्याच्या बदल्यात शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तीन अधिकाऱ्यांवर कारवाईमीडिया रिपोर्ट्सनुसार, एफआयआरमध्ये सांगण्यात आले की, समीर वानखेडेच्या सांगण्यावरून गोसावीने आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची मागणी केली होती. या रकमेच्या बदल्यात आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. NCB व्हिजिलन्सने 25 ऑक्टोबर 2021 रोजी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि 11 मे रोजी CBI कडे अहवाल सादर केला. सीबीआयला सादर केलेल्या अहवालानुसार, व्हिजिलन्स विभागाने समीर वानखेडे, अधीक्षक विश्व विजय सिंह आणि गुप्तचर अधिकारी आशिष रंजन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
क्रांती रेडकरची प्रतिक्रिया:-
गोसावी वानखेडेसाठी डील करत होता
समीर वानखेडे यांनी गोसावीला या प्रकरणात पैसे मागण्याची पूर्ण सूट दिली होती. गोसावी याने 18 कोटींमध्ये सौदा पक्का केला होता. एवढंच नाही तर गोसावीने 50 लाख रुपये अॅडव्हान्सही घेतले होते. एफआयनुसार, तपासात समीर वानखेडेनेंही आपल्या परदेश प्रवासाबाबत योग्य माहिती दिली नाही. त्यांनी त्यांच्या महागड्या घड्याळ आणि कपड्यांबद्दल खोटी माहिती सांगितली. समीर वानखेडे यांच्या बेहिशोबी मालमत्तेचाही एफआयआरमध्ये उल्लेख आहे.
वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचा छापा या तिन्ही अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य विसरुन आरोपींकडून फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालाच्या आधारे सीबीआयने समीर वानखेडे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून 29 ठिकाणी छापे टाकले. 12 मे रोजी समीर वानखेडेंवर मोठ्या कारवाईत सीबीआयने त्यांच्या ठिकाणांवर छापा टाकला. सीबीआयच्या पथकाने वानखेडेंची त्याच्या मुंबईतील घरी 13 तासांहून अधिक काळ चौकशी केली.