शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

सालाबादप्रमाणे यंदाही वारकऱ्यांना आजपासून टोलमाफ; कसा मिळवणार? कधीपर्यंत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:11 IST

२०२२ मध्ये राज्य सरकारने पहिली टोलमाफी जाहीर केली होती. परंतू, तिथे टोल नाक्यावर प्रत्यक्षात कोण मुख्यमंत्री, आधी जीआर दाखवा मग पाहू असे म्हणत टोल आकारण्यात येत होता. तसाच प्रकार २०२३ मध्येही घडला होता.

पंढरीची वारी सुरु झाली आहे. पुण्यातून पालखी पुढे सासवडच्या दिशेने निघाली असून येत्या काही दिवसांत चोहोबाजुंनी पंढरपूरकडे वाहनांचे जथ्थेच्या जथ्थे येणार आहेत. या वारकऱ्यांना राज्य सरकारने दरवर्षीप्रमाणे टोलमाफी जाहीर केली आहे. परंतू, ही टोलमाफी असेच टोलनाक्यावर गेल्यावर मिळणार नाही तर त्यासाठी वाहन मालकांना वाहनाची कागदपत्रे घेऊन जवळचे आरटीओ कार्यालय गाठावे लागणार आहे. 

वारकऱ्यांना आजपासून टोलमाफी मिळणार असून २१ जुलैपर्यंत याची मुदत ठेवण्यात आली आहे. वारकऱ्यांना टोलनाक्यावर आरटीओने दिलेला पास, स्टीकर दाखवावा लागणार आहे. यानंतरच वाहन सोडले जाणार आहे. या पास, स्टीकरशिवाय वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार नाही. 

२०२२ मध्ये राज्य सरकारने पहिली टोलमाफी जाहीर केली होती. परंतू, तिथे टोल नाक्यावर प्रत्यक्षात कोण मुख्यमंत्री, आधी जीआर दाखवा मग पाहू असे म्हणत टोल आकारण्यात येत होता. तसाच प्रकार २०२३ मध्येही घडला होता. वारकऱ्यांना नेमकी टोलमाफी कशी घ्यावी याची माहितीच दिली जात नव्हती. शिंदेंनी टोलमाफी जाहीर केलेली असली तरी आदेश जारी केला नव्हता. यामुळे वारकरी आणि टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात वाद होत होते. 

यंदा खूप लवकर टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे जे वाहनाने जाणारे वारकरी आहेत त्यांच्याकडे कारचे आरसी, पीयुसी, इन्शुरन्स ही कागदपत्रे असतील तर आरटीओत जाऊन अर्ज भरून टोलमाफी घेण्याची संधी असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी एसटी बसला देखील टोलमाफी जाहीर केलेली आहे. तसेच गरज असेल तर अवजड वाहतूकही थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

फास्टॅगमध्ये पैसे असतील तर...

जर तुमच्या फास्टॅगमध्ये पैसे असतील व टोलमाफीचा पास मिळाला असेल तर तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. एकतर फास्टॅगवर अॅल्युमिनिअम फॉईल चिकटवावी लागेल किंवा आतून स्क्रीन ऑन केलेला मोबाईल धरावा लागणार आहे. असे केल्यासच टोल नाक्यावरील स्कॅनरद्वारे तुमचा फास्टॅग स्कॅन होणार नाही व पैसे कापले जाणार नाहीत.   

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Pandharpur Wariपंढरपूर वारीtollplazaटोलनाकाEknath Shindeएकनाथ शिंदे