शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
2
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
3
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?
4
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
5
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
6
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
7
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
8
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
9
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
10
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
11
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
12
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
13
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
14
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
15
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
16
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
17
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
18
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
19
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
20
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले

Eknath Shinde: मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत...; एकनाथ शिंदेंचा राज्यातील जनतेला मोठा शब्द

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 4:10 PM

Eknath Shinde's Reaction on Hit and Run Case, Accident's: पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा बिल्डर बाळाचा प्रताप समोर असतानाच नुकताच मुंबई आणि पुण्यात दोन अपघात घडले आहेत. या काळातही अनेक अशाप्रकारचे अपघात झालेले आहेत.

गेल्या काही महिन्यांत एकामागोमाग एक असे दारुच्या नशेत अपघात करण्याचे आणि पळून जाण्याचे प्रकार घडू लागले आहेत. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने आरोपी सापडतात परंतू ग्रामीण भागात कोण ठोकून गेला हे आकाश पाताळ एक केले तरी कळत नाही. पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा बिल्डर बाळाचा प्रताप समोर असतानाच नुकताच मुंबई आणि पुण्यात दोन अपघात घडले आहेत. या काळातही अनेक अशाप्रकारचे अपघात झालेले आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर भुमिका घेण्याचे आश्वासन राज्यातील जनतेला दिले आहे. 

कारवाला येतोय, उडवून जातोय! हेल्मेट घाला, नाहीतर चिलखत, महाराष्ट्रात दुचाकी चालविणे म्हणजे...महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने मी अत्यंत चिंतेत आहे. शक्तिशाली आणि प्रभावशाली लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून अपघाताच्या घटनांमध्ये फेरफार करतात हे असह्य आहे. माझ्या सरकारकडून न्यायाचा असा गर्भपात सहन केला जाणार नाही, असे ट्विट शिंदे यांनी केले आहे. 

सर्वसामान्य नागरिकांचे प्राण आपल्यासाठी अनमोल आहेत. ही प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि न्याय मिळावा याची खात्री करण्यासाठी मी राज्य पोलीस विभागाला निर्देश दिले आहेत. याव्यतिरिक्त, आम्ही कठोर कायदे आणि हिट अँड-रन गुन्हेगारांसाठी कठोर दंडांची अंमलबजावणी करत आहोत, असेही शिंदे म्हणाले. 

मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही, मग तो श्रीमंत असो, किती तो प्रभावशाली असो, किंवा नोकरशहा किंवा मंत्रीपूत्र असो , कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, त्याला गुन्ह्यातून सुटण्यासाठी ताकद मिळणार नाही. अन्याय मुळीच खपवून घेतला जाणार नाही, असा शब्द शिंदे यांनी दिला आहे. 

मुंबई आणि पुण्यात दोन गंभीर अपघात झाले आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाने दारुच्या नशेत दुचाकीस्वार दाम्पत्याला उडविले आहे. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात दापोडी येथे खडकी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना कारचालकाने दारुच्या नशेत उडविले आहे. यात एका पोलीस कर्माचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. महिनाभरापूर्वी बिल्डर बाळाने काही वाहनांना उडवत दोघांचा जीव घेतला होता. तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी आमदारापासून ससून हॉस्पिटलपर्यंत प्रयत्न झाले होते. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAccidentअपघातShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईPuneपुणे