मुंबई : वैद्यकीयमहाविद्यालयांमध्ये संस्थात्मक कोट्यातून प्रवेशात गैरव्यवहार केल्याप्रकरणी तसेच विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त विकास शुल्काची आकारणी केल्याप्रकरणी दाखल तक्रारींची दखल वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतली आहे. त्यानुसार राज्यातील नऊ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची तपासणी करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाच्या तपासणीसाठी दोन अधिकाऱ्यांच्या समितीची नियुक्ती केली आहे. या समितीला पुढील आठ दिवसात अहवाल राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे सादर करावा लागणार आहे.
विद्यार्थ्यांकडून विकास शुल्काच्या नावाखाली अधिक शुल्क घेतल्याचा आरोप युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी केला होता. याबाबत शुल्क नियामक प्राधिकरण आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाने या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या महाविद्यालयांची होणार चौकशी- तेरणा वैद्यकीय महाविद्यालय, नवी मुंबई- वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, पालघर- डॉ. एन. वाय. तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कर्जत- श्रीमती काशीबाई नवले कॉलेज, पुणे- एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे- भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे- अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर- प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च, सांगली- एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, लातूर
विकसन शुल्काआड पालकांची लूट - कैंप फेरीत मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शुल्क सवलत नाकारण्यात येत आहे. तसेच महाविद्यालयाकडून विकसन शुल्काच्या नावाखाली विद्यार्थी पालकांची लूट सुरू आहे. या कॉलेज यांना विकसन शुल्क म्हणून शुल्काच्या १० टक्के रक्कम घेणे अनिवार्य असताना ते सरसकट ५० हजार ते २ लाखांचे दरम्यान अतिरिक्त शुल्क आकारत आहे, असेही तक्रारीत नमूद आहे.
नामवंत महाविद्यालये1. नियमभंग झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठी मुंबईतील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नवी मुंबई, पालघर आणि कर्जत येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची तपासणी करावी लागणार आहे.2. पुण्यातील बें. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुणे जिल्ह्यातील तीन महाविद्यालयांची चौकशी करावी लागेल.3. सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयाची चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे.4. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या महाविद्यालयाला प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च अँड रिसर्च या कॉलेजची चौकशी करावी लागेल.5. तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.